पार्था या जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयालागी । अखंड मज ।।
सध्या अध्यात्मावर फारशी चर्चा करताना कोणी दिसत नाही. फारसा रस कोणी दाखवतही नाही. पण देवदर्शनासाठी सगळीकडे रांगांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गणेश उत्सवात गणपती पाहण्यासाठी गर्दी केली जाते. नवरात्र आले की देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. इतरही अनेक मंदिरात दर्शनासाठी रांगांच्या रांगा पाहायला मिळतात. पंढरीत तर नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग असते. आळंदीतही गर्दी होते. दर्शन मिळावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणी केवळ मुख दर्शन घेऊनच समाधानी होतात. तर कोणी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. दर्शन कोठूनही घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचते. फक्त मनापासून दर्शन करायला हवे. मनातूनही दर्शन घडते. देवाची ओढ असणाऱ्यांना देव स्वप्नातही येऊन दर्शन देतात. फक्त दर्शनाची ओढ असावी लागते. सद्गुरूंचे सतत स्मरण करणारे भक्त त्यांना अधिक प्रिय असतात. आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment