Sunday, August 30, 2020

समाधी पाद - चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग

 


समाधी पाद - चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग

सूत्र - ३६ विशोका वा ज्योतिष्मती

या सूत्रात चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग सांगितला आहे.

विशोका = शोकरहित वा = किंवा ज्योतिष्मती = प्रकाशमय प्रवृत्ती मनाच्या स्थितीला ताब्यात ठेवते. मनाची चंचलता रोखून धरते.

ज्याप्रमाणे याआधीच्या सूत्रात गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द ही ध्यानाची ठिकाणे सांगितली, त्याप्रमाणे विशोका ज्योतिष्मती या प्रवृत्तीचीही विशेष ठिकाणे आहेत. ती ठिकाणे सुषुम्नेच्या मार्गात असलेल्या मणिपूरक ((नाभी), अनाहत (हृदय) आणि आज्ञा (भ्रूमध्य) या चक्रांच्या ठिकाणी चित्त स्थिर करायला हवे. यामुळे सुद्धा चित्त स्थिर होण्यास मदत होते.

 लेखन - प्रा. अ.रा. यार्दी, धारवाड.

समाधी पाद यावरील अन्य लेख वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, August 28, 2020

वाईचा ढोल्या गणपती

 


वाईचा ढोल्या गणपती

पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे महागणपती मंदिर. आखिव-रेखिव घाट, बाळसेदार स्वरुपामुळे ढोल्या गणपती अशी नावं पडले असावे... जाणून घ्या या गणपतीचा इतिहास..

वाचा सविस्तर पर्यटनमध्ये on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari


पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे महागणपती मंदिर. आखिव-रेखिव घाट, बाळसेदार स्वरुपामुळे ढोल्या गणपती अशी नावं पडले असावे... जाणून घ्या या गणपतीचा इतिहास..

वाचा सविस्तर पर्यटनमध्ये on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @

 https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Wednesday, August 26, 2020

हा कोपे कीं निवातु साहे । हा रुसे तरी बुझावीत जायें । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)





 

रागाने त्याने कितीही ओरडा केला, तर ती प्रेमाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचे सर्व अपराध ती माफ करते. तो रुसला तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. हे सर्व प्रेमाने सुरु असते. आईचे मुलावरील प्रेम हे त्याच्या प्रगतीसाठी असते.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


हा कोपे कीं निवातु साहे । हा रुसे तरी बुझावीत जायें ।
नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ।। 172 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत काढत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे.

Read more
on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

समाधीपाद - साक्षात्कार कशामुळे होतो ?

 


समाधीपाद - साक्षात्कार कशामुळे होतो ?

अध्यात्मात साक्षात्कारास अनन्य साधारण महत्त्व आहे. पण साक्षात्कार कशामुळे होतो. साधनेत कसा साक्षात्कार होतो. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.... विश्र्वाचे आर्त यामध्ये....on इये मराठीचिये नगरी. 

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, August 23, 2020

समाधीपाद - मनावर ताबा मिळवण्याची प्राणायाम

 

समाधिपाद सूत्र-३४ प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य


प्रच्छर्दनविधारणाभ्यां = नाकावाटे बाहेर फेकणे आणि रोखून धरणे, अशा दोन्ही प्रकारे किंवा प्राणस्य - कोठ्यातल्या वायूच्या आधारे मनावर ताबा मिळवता येतो. याचा अर्थ प्राणायामाद्वारे मनावर ताबा मिळवावा.

प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पूरक-आत घेणे. रेचक-बाहेर सोडणे;

 पूरक -आत घेणे, कुंभक- रोखून धरणे, रेचक-बाहेर सोडणे, हे दोन प्रकार लोकांच्या परिचयाचे आहेत. यांव्यतिरिक्त अनुलोम विलोम, भस्रिका, कपालभाती, अग्निसारक्रिया हे प्राणायामाचे इतर प्रकार सुद्धा करून बघता येण्यासारखे आहेत. जाणत्यांच्याकडून ते प्राणायाम शिकून घेऊन रोज त्याची अंमलबजावणी करावी आणि मनावर ताबा मिळवावा. आजकाल योगाचा भरपूर प्रसार झालेला आहे. त्यामुळे प्राणायाम शिकवणाऱ्यांची कमतरता नाही. फक्त तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घेणे महत्त्वाचे!.  

 दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यंदा मला:.

तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषा:प्राणस्य निग्रहात्.  

ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात येताच धातूंमधील घाण निघून जाते, त्याप्रमाणे प्राणाच्या मदतीने इंद्रियांचे दोष सुद्धा नाहीसे होतात.

- डॉ अ. रा. यार्दी, धारवाड

For details download Iye Marathichiye Nagari app

Search Iye Marathichiye Nagari on Google Play Store

OR

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari


ज्ञानेश्वरीत शेतीच्या उदाहरणावरून प्रबोधन उदर्शन ( एक तरी ओवी अनुभवावी)

 

ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन
कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. ... 
वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये
on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari on Google Play Store OR
 Download App @ 

घरातच तयार करा हेअर पॅक...( व्हिडीओ)

 

घरातच तयार करा हेअर पॅक...( व्हिडीओ)

घरच्या घरी हेअर पॅक करता येऊ शकतो. कसा करायचा हेअर पॅक जाणून घ्या प्रोफेशनल आर्टीस्ट स्मिता पाटील यांच्याकडून....

वाचा सविस्तर मुक्त संवादमध्ये on इये मराठीचिये नगरी

Search on Google Play Store
Iye Marathichiye Nagari

OR
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।(एकतरी ओवी अनुभवावी).


किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।(एकतरी ओवी अनुभवावी).
ज्ञानेश्‍वरांनी शेतीच्या उदाहरणातून अध्यात्म शिकवले. मुळाशी पाणी घाला. पाण्याची बचत होते. झाडही उत्तम वाढते. वाया जाणारे पाणी वाचवा. ठिबक सिंचनाचा विचार त्याकाळातही होता. फक्त आता उत्पादने घेताना हा विचार ठेवा. वाचा सविस्तर
 on इये मराठीचिये नगरी. 

 Download App @ 

Thursday, August 20, 2020

जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! ... वाचा सविस्तर

 

जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! 

पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. अधिक वृक्ष असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा जलद होतो. बरेचसे पाणी वृक्षच शोषून घेतात. हे विचारात घेऊन पाणथळ जमिनी क्षारपड होऊ नयेत यासाठी वृक्ष लागवड केली जाते.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेचि जळ ।

जिरालें कां केवळ । तयाचांचि आंगीं ।। 174 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - झाडांच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही, तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते.

वाचा सविस्तर...on इये मराठीचिये नगरी. 

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, August 18, 2020

न पेरितां सैंध तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जयापरी ।। (एकतरी ओवी अनुभवावी).

 

न पेरितां सैंध तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जयापरी ।। (एकतरी ओवी अनुभवावी). 

चांगले विचार हे पेरावे लागतात. सद्‌गुरू शिष्यामध्ये या विचारांची पेरणी करतात. अनुग्रह देतात म्हणजे काय? तर चांगल्या बीजाची ती पेरणीच असते.....

वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, August 16, 2020

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर (व्हिडिओ)

 

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर (व्हिडिओ). 

प्रत्यक्षात मात्र ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडे काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर होय.

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती मध्ये on इये मराठीचिये नगरी.app...
#पर्यावरणवाचवाचळवळ
#SaveKonkanEnvironment
#म #मराठीतच #मराठीपन
#मराठीबोलाचळवळ
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, August 14, 2020

अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा । ( एकतरी ओवी अनुभवावी)

 


अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा । ( एकतरी ओवी अनुभवावी)

गुरु - शिष्याची ही परंपरा खंडीत झाली आहे असे वाटत असले तरी ती विचाराने पुन्हा पुढे सुरु राहाते. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती आहे. ती टिकवण्यासाठी आपण कार्य करायला हवे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा ।
तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजो तरी ।। 43 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरुप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा. 

गुरु आणि शिष्याचे नाते कसे असते हे श्रीकृष्णाच्या विश्वरुपदर्शनातून स्पष्ट होते. शिष्यासाठी गुरु काय करतात.? त्याच्या प्रगतीसाठी गुरुंना काय काय करावे लागते? हे यातून सहजच स्पष्ट होते. शिष्याचा सर्वांगिन विकास हेच गुरुंचे ध्येय असते. सध्याच्या युगात असे गुरु फारच क्वचित पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्वकाळात असे गुरु होते. अशा गुरुंच्यामुळेच देशात स्वातंत्र्यांची चळवळ उभी राहू शकली हेही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्यानंतर तो विचार पुढे काही काळ देशात पाहायला मिळाला. पण सध्या असे गुरु फार क्वचितच पाहायला मिळत आहेत. 

स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. अशा शिक्षकांच्या त्यागामुळेच त्यांच्या शिष्यांनी मोठी मजल मारली. खेड्यापाड्यातून, वाडी वस्त्यातून, शहरातही असे त्यागी गुरू पाहायला मिळत. शिष्यानीही त्या गुरुंचे गोडवे गायीले. सांगण्याचा उद्देश हाच की गुरुंच्या त्यागातूनच शिष्य घडत असतो. सध्याच्या काळात असे गुरु फारच क्वचित पाहायला मिळतात. त्याला कारणेही तशी आहेत. त्या काळातील परिस्थिती तशी होती. त्यावेळेची ती गरजही होती. बदलत्या काळात गुरुंच्या समोरच अनेक अडचणी उभ्या आहेत. राजकारणही तितकेच महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षण संस्था राजकिय व्यक्तींच्या हातात आहेत. त्याचा वापर ते त्यांच्यासाठी करत आहेत. अशाने त्यागाची भावनाच नष्ट झाली आहे. त्यागीवृत्तीने काम करण्याची वृत्तीच लुप्त होताना पाहायला मिळत आहे. 

त्यागतरी कुणासाठी करायचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तसे शिष्यही असायला हवेत. तशा व्यक्तीही असायला हव्यात. शिष्यामध्येही तितकीच त्यागी वृत्ती असायला हवी. राजकिय व्यक्तींमध्येही त्या त्यागाची भावना असायला हवी. ते गुण असायला हवेत. बऱ्याचदा असे असतेही पण याकडे दुर्लक्ष केले गेल्याने सुद्धा मानसाच्या वृत्तीत बदल घडत आहेत. एकंदरीत विचार केला तर गुरु-शिष्याची ही जोडगोळी, ही परंपरा आता शिक्षण क्षेत्रात लुप्त होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या जीवनात त्याचा पहिला गुरु ही त्याची माता असते. मग ती जन्मदाती असो व नसो. जीवनात त्याचे पालनपोषन करणारी माता हीच त्या व्यक्तीची पहिली गुरु असते. 

मुलांस सांभाळणारी आई हीच प्रथम गुरु आहे. भगवान कृष्णांचा जन्म द्वारकेत झाला. देवकीच्या पोटी जन्म झाला. पण कृष्ण गोकुळात वाढला. यशोदने कृष्ण वाढवला. म्हणजे जन्माने जरी मात नसली तरी प्रेमाने यशोदा ही त्यांची माता होती. देवाच्या बाबत, राजाच्या बाबत हे घडते. मग सर्व सामान्यांच्या जीवनातही तेच आहे. प्रेमाने, त्यागाने वाढवणारी माताच मुलाला मोठे करू शकते. हे गुरु-शिष्याचे नाते आहे. मातेचा त्याग हा मोलाचा असतो. आई मुलासाठी काय करु शकते ? गुरु - शिष्यासाठी काय करु शकतो ? मुलाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न माता करत असते. 

शिष्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला सामर्थ्यवान करण्यासाठी गुरु झटत असतात. भगवान कृष्णांनी अर्जुनाला गीता ही याचसाठी सांगितली आहे. शिष्याला जागृत करण्यासाठी त्यांनी विश्वरुप दर्शनही घडवले. अगदी सहजपणे त्यांनी शिष्याला भानावर आणत त्याचे कार्य काय आहे हे समजावून सांगितले. हतबल झालेल्या शिष्याला सामर्थ्य देण्याचे काम गुरूचे आहे. गुरु - शिष्याची ही परंपरा खंडीत झाली आहे असे वाटत असले तरी ती विचाराने पुन्हा पुढे सुरु राहाते. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती आहे. ती टिकवण्यासाठी आपण कार्य करायला हवे. 

लेेेखन - राजेेंद्र कृष्णराव घोरपडे

.....

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन, यांसह आता शेती, घडामोडी, संशोधन, राजकारण, स्पर्धा परीक्षा असं विविध वाचण्यासाठी आमच्या चॅनलला जॉईन व्हा.

https://t.me/IyeMarathichiyeNagari

या लिंक वर क्लिक करून

Sunday, August 9, 2020

परी मनीं धरुनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें । का पेंव करुनि आइतें । पेरुं जाइजे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 आता दुधात अनेक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जात आहे. ही भेसळ ओळखण्याचे तंत्रज्ञानही आपल्याकडे उपलब्ध नाही. अशामुळे ही भेसळ अधिकच होताना पाहायला मिळते.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे , मोबाईल 8999732685

परी मनीं धरुनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें ।
का पेंव करुनि आइतें । पेरुं जाइजे ।। 285 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - परंतु मनात दुभत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणें गायीला पोसावें, किंवा दाणे साठविण्याकरितां अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावे.

कष्टकरी जनावरांची संख्या घटत आहे. त्याचे संगोपन आता शेतकरी करत नाहीत. वाढत्या महागाईमुळे अशी जनावरे पाळणे आता अशक्‍य झाले आहे. पण दुभत्या जनावऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या केवळ दुधासाठीच जनावरे पाळली जात आहेत. अधिकाधिक दुधाचे उत्पादन देणारी जनावरेच पाळली जात आहेत. देशी गाय दुधाचे उत्पादन कमी देते, त्यामुळे तिचे संगोपन केले जात नाही. अशामुळे देशी गायींची संख्या घटली आहे. मानव आता इतका लालची झाला आहे. की त्याला चांगल्या - वाईट गोष्टींची दखलही घ्यायला वेळ नाही. केवळ भरघोस उत्पादन हेच त्याच्या डोक्‍यात शिरले आहे. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या गायी - म्हशींचे संगोपन आज केले जात आहे. शेती हा उद्योग म्हणून करायला हवा. हे खरे आहे. पण उद्योगात अधिक कमविण्याची हव्यासापोटी नुकसान होते, हे विचारात घ्यायलाच हवे. हाव ठेवून उत्पादने घेतल्याने उद्योग रसातळाला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. दुग्ध व्यवसायातही हाच नियम लागू आहे. दुधाचा दर फॅटवर ठरविला जातो. फॅट कसे वाढवता येते यावर दूध उत्पादक भर देत आहेत. काही शेतकरी भेसळ करून फॅट वाढवितात. अशा भेसळीमुळे दुधाची प्रत आता खालावली आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. भेसळ ओळखणेही कठीण असते. दुधात पाणी मिसळले जाते व फसवणूक केली जाते. दुधात पाणी मिसळलेले महिलांच्या लक्षात येते. गवळ्याला लगेच याबाबत त्या सुनावतातही. पण आता दुधात अनेक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जात आहे. ही भेसळ ओळखण्याचे तंत्रज्ञानही आपल्याकडे उपलब्ध नाही. अशामुळे ही भेसळ अधिकच होताना पाहायला मिळते. भेसळीचे दूध नुसत्याच नजरेने, वासाने व चवीने ओळखले जात नाही. वेगळेही करता येत नाही. भेसळ ओळखण्यासाठी रासायनिक चाचण्या केल्या जातात. पण अशा चाचण्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच्या आहेत. प्रयोगशाळांचीही कमतरता आहे. दुधात विविध प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी आता प्रबोधनाचीही गरज आहे. दुधात सोडा, हायड्रोजन पॅरॉक्‍साईड, फॉरमॅलीन, साखर, स्टार्च किंवा मैदा, ग्लुकोज, युरिया, अमोनियम सल्फेट, मीठ, साबणाचा चुरा, स्किम मिल्क पावडर, वनस्पती तूप आदीची भेसळ केली जाते. दुधापासून अधिक उत्पादन मिळविण्याच्या हव्यासापोटी ही भेसळ केली जाते. अशाने अनेकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. समस्त मानव जातीचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर आता शेतकऱ्यांनीच याबाबत पाऊल उचलण्याची गरज आहे. शेतकरी हे करू शकतो. उत्तम, आरोग्यास पोषक असेच उत्पादन घेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला तर यावर आळा घालता येणे शक्‍य आहे. दुधासाठी संकरित गायी-म्हैशींच्यासह एक देशी गाय पाळण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी करायला हवा. देशी गायीचे महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखायला हवे. तिचे फायदे विचारात घ्यायला हवेत. कमीत कमी स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीतरी शेतकऱ्यांनी देशी गाय पाळावी. 



Friday, August 7, 2020

जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक । कां मिरयामांजीं तीख । ऊंसी गोड ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )


देहात आत्मा आला आहे. तो देहापासून वेगळा आहे. आत्मा जसे देहात चैतन्य निर्माण करते. तसे पाणीही ज्याच्याशी संगती करते त्यात चैतन्य निर्माण करते. पेशीमध्ये फुगीरपणा आणते. पाणी आहे तो पर्यंत पेशीत जिवंतपणा राहतो.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक ।
कां मिरयामांजीं तीख । ऊंसी गोड ।। 68 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतः जगविणारेंच आहे, परंतु विषाशी युक्त झाले असतां तें मारक होतें अथवा मिऱ्यांशी युक्त झाले असतां तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते.

पाण्याशिवाय जीवसृष्टी जगूच शकत नाही. पाणी नाहीतर जीवच नाही. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर तेथे जीवसृष्टी आहे. इतरत्र कोठेही पाणी नाही त्यामुळे इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीवर 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. पण हे सर्वच पाणी पिण्यायोग्य नाही. तसे असते तर शुद्ध पाण्याची टंचाई भासली नसती. समुद्राचे पाणी खारट आहे. ते आपण तोंडातही घेऊ शकत नाही. पण हा सागरच शुद्ध पाण्याचा पुरवठा करतो. सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते व तेच पाणी जमिनीवर पडते. ते शुद्ध असते. पाणी शुद्ध करण्याची ही नैसर्गिक पद्धती आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच आज मानव जात जिवंत आहे. इतर जिवांना शुद्ध पाणी लागतेच असे नाही. सागराच्या पोटातही अनेक जीव आहेत. ते कसे जगतात. त्याला तेच पाणी लागते. ते शुद्ध पाण्यात जगू शकत नाहीत. मानवास मात्र शुद्ध पाणी लागते. ही शुद्धता टिकवणे हे मानवाचे कर्तव्य आहे.

पाण्यात मीठ मिसळले की ते खारट होते. तिखटात पाणी मिसळले की त्याची चव तिखट होते. पाण्यात साखर मिसळली की गोड होते. सर्वच ठिकाणी एकच पाणी आहे पण ज्या त्या पदार्थानुसार त्याची चव बदलली आहे. कारण शुद्ध पाण्याचा पीएच सात आहे. न्यूट्रल आहे. तो चवहीन आहे. आत्मा हा सुद्धा चवहीन आहे. त्याला चव नाही. त्याला वास नाही. आत्मा हा देहात आल्याने त्या देहानुसार तो दिसतो आहे. चिडक्‍या मानसाचा आत्मा चिडका वाटतो. शांत मानसाचा आत्मा शांत वाटतो. खेळकर मानसाचा आत्मा खेळकर वाटतो. मानसाच्या स्वभावानुसार त्याचा आत्मा तसा वाटतो. प्रत्यक्षात आत्मा हा एकच आहे. तो ज्या देहात मिसळला तसा त्याचा स्वभाव झाला असे भासते. प्रत्यक्षात हा आत्म्याचा स्वभाव नाही त्या देहाचा स्वभाव आहे. मिरची तिखट आहे. हा मिरचीचा गुणधर्म आहे. पाणी हे बेचवच आहे. मिरचीमध्ये मिसळल्याने ते तिखट वाटते. विषासोबत मिसळल्याने ते विषारी वाटते. प्रत्यक्षात त्याचे कार्य विषारी नाही. संगतीनुसार त्याचे कार्य बदलते. यासाठी संगत कोणाची करावी? संगत सर्वांशी करावी पण त्याच्यात मिसळू नये. तो वेगळा आहे, हे जाणावे. तो स्वतंत्र आहे. हे जाणावे.

देहात आत्मा आला आहे. तो देहापासून वेगळा आहे. आत्मा जसे देहात चैतन्य निर्माण करते. तसे पाणीही ज्याच्याशी संगती करते त्यात चैतन्य निर्माण करते. पेशीमध्ये फुगीरपणा आणते. पाणी आहे तो पर्यंत पेशीत जिवंतपणा राहतो. पाणी गेले की त्यातील जिवंतपणा नाहीसा होतो. शरीर हे या पेशींनीच तयार झाले आहे. यातील पाण्याचे कार्य ओळखायला हवे. शरीराला शुद्ध पाण्याची गरज असते. ही शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न हवेत. जीवनातील पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा. 

Thursday, August 6, 2020

ज्ञानेश्‍वरीत मांडला आहे पाणी व्यवस्थापनाचा विचार


पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी घेतात. एका पिकातच दुसरे पीक घेऊन अधिक उत्पन्नही मिळवतात. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पाणी मुदल झाडा जाये । तृण तें प्रसंगेचि जिये ।
तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ।। 218 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - पाणी मुख्य झाडाला जातें आणि पाटाच्या काठावर असणारें गवत सहजच जगते, त्याप्रमाणें कोणा एकाला उद्देशून बोललेले असतां ( त्या बोलण्यांत ) सर्वांचे हित होतें.

पूर्वी मोटेच्या, रहाटाच्या साहाय्याने पाणी खेचले जायचे. ते पाणी पाटाने शेतीला दिले जात होते. आजही शेतीला पाटाने पाणी दिले जाते. पण पूर्वीच्या काळी पंप नव्हते. पाणी खेचण्याचा वेग कमी होता. यामुळे वाट्टेल तसे पिकाला पाणी देऊन चालत नव्हते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार तेव्हा केला जात होता. खेचलेल्या पाण्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचा प्रयत्न होता. मुख्य पिकाला पाणी देताना वाया जाणाऱ्या पाण्यावर अन्य काही पिके घेण्याचेही प्रयत्न केले जात होते. पाटाच्या काठावरील गवताला याचा लाभ होत असे. तेथे हिरव्यागार गवताची वाढ झाली. हे गवत जनावरांना चारा म्हणून वापरता येऊ लागले. जनावरांना हिरवा चारा झाला. मुख्य पिकाला पाणी देताना इतर वनस्पतींनाही या पाण्याचा लाभ होतो. हाच विचार करून पुढे मिश्र शेतीची पद्धत विकसित झाली.

वाया जाणारे पाणी कसे वापरता येईल याचा विचार शेतकरी करत असत. हे केले तर काय होईल. ते केले तर काय होईल. असा विचार ते प्रत्यक्षात करून पाहात. वाया जाणारे श्रम, वेळ, पाणी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पिकाला पाटाने पाणी देताना पाणी वाया जाते. त्या पाण्यावर इतरही पिके येऊ शकतात हे विचारातच घेतले जात नाही. सरीत पाणी सोडले की बंद करायलाच शेतकरी पुन्हा शेतात येतो.

अशाने पिकाला योग्य प्रमाणात पाणी दिलेच जात नाही. पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. उत्पादनात घट होते. याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या मनापासून शेती केलीच जात नाही. मनापासून शेती केली जात असती तर असे नुकसान झाले नसते. पाण्याच्या मुबलकतेमुळे हे सर्व घडत आहे. पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे. याबाबत आता शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाणही कमी जास्त ठेवावे लागते. मध्यम जमिनीत प्रत्येक पाळीत आठ सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी द्यावे लागते. खोल काळ्या जमिनीत प्रत्येक पाळीत दहा सेंटीमीटर, तर उथळ जमिनीत सहा सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी देणे आवश्‍यक असते. उथळ जमिनीत जलसंधारणशक्ती पेक्षा जास्त झालेले पाणी गुरुत्वाकर्षणाच्या दाबाने निघून जाते. पिकांना पाणी देण्याची खोली ठरविताना जमिनीची उपलब्ध जलधारणाशक्ती तसेच पिकाची अवस्था विचारात घ्यावी लागते.

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी घेतात. एका पिकातच दुसरे पीक घेऊन अधिक उत्पन्नही मिळवतात. पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवून कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त पिके घेण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबले पाहिजे. पण हे करताना पर्यावरणाचा विचारही हवा. नेमके याच प्रश्‍नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.

जवळपास इसवीसन पूर्व 8000 वर्षांपूर्वी शेतीचा उदय झाला असे समजले जाते. गेल्या सुमारे पाच हजार वर्षांमध्ये शेतीचा विकास झाला आहे. असे संशोधकांचे मत आहे. पिकांना पाणी देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्यानंतर शेतीत मोठा बदल झाला. पाणी हेच जीवसृष्टीचे अस्तित्वाचे प्रमुख कारण आहे. पाणी नसते तर ही जीवसृष्टीच अस्तित्वात आली नसती. इतर कोणत्याही ग्रहावर पाणी नाही. त्यामुळे तेथे सचिवाचे अस्तित्वच नाही. याचा विचार करून पाण्याचा वापर कसा करायला हवा याचा विचार व्हायला हवा. पिकांना पाणी देण्याच्या पद्धती विकसित झाल्या पण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे विचारात घ्यायला हवे. याकडे दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्रत्येक मिनीटाला 50 टन सुपीक जमीनीची धूप होत आहे. प्रत्येक तासाला 1692 एकर जमीन नापिक होत आहे. सध्या शेतीसमोर हेच मोठे आव्हान आहे. जमीनीची धूप होणार नाही असे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.

पिकांना पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तरच जमिनीची होत असलेली धूप थांबवता येईल. पिकांना पाणी देताना याचा विचार व्हायला हवा. पिकांना पाटाने पाणी देताना पाटामध्ये वाढणारे गवत किती उपयोगी आहे याचा विचार बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरांनी सांगितला आहे. पाणी वाहताना वाहून जाणारी माती गवतामुळे रोखली जाऊ शकते. जमिनीची होणारी धूप यामुळे रोखता येऊ शकते. मुख्य पिकाला पाणी देताना गवतालाही पाटात पाणी मिळते. गवताची वाढ होते. पण सध्या शेती करताना इतका बारीक विचार केला जात नाही. अशाने शेतीचे नुकसान वाढत चालले आहे. शेती करताना नुकसान होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करायला हवा. तरच भावी काळात शेती टिकवून ठेवता येईल.

सुपीक जमिनीचे क्षेत्र घटत आहे. अशा काळात शेतीतील तोटे विचारात घ्यायलाच हवेत. गांभीर्याने याकडे पाहायला हवे. पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास पाणी पिकाच्या मुळाशी दिले जाते. पाण्याची बचत होते. पाण्याचा योग्य वापर होतो. पिकांची वाढ उत्तम होते. जमिनीची धूपही होत नाही. तणांचा प्रादुर्भाव रोखता येतो. उत्पादनात वाढ होते. असे असताना आजही देशात पाटानेच पाणी दिले जाते. यावर आता शेतकऱ्यांनीच विचार करायला हवा. पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे घटते प्रमाण विचारात घेऊन आता शेतकऱ्यांनी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे.

आज हरितगृहाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हे तंत्र वापरणे शक्‍य नाही. तितकी त्या शेतकऱ्यांची कुवतही नाही. देशात आज 80 टक्के शेतकरी हे अल्प भूधारक आहेत. अशावेळी शासनाच्या योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहेत. याचाही विचार आता व्हायला हवा. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने नियोजन आखायला हवे. आज 20 टक्के शेतकऱ्यांचा विचार करून शेतीच्या योजना आखल्या जातात. अशाने शेतीची प्रगती झालेली दिसते पण त्याबरोबरच अल्पभूधारक शेतकरी शेती सोडून इतर उद्योगाकडे वळताना पाहायला मिळत आहे. शेती करणे आता त्याच्या कुवतीबाहेरचे झाले आहे. देशात शेती सोडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आकडे वाढत असल्याने भावीकाळात शेती हा व्यवसाय धोक्‍यात येऊ शकतो. याचाही विचार शासनाने करायला हवा. शासनाची योजना दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यासाठी असायला हवी. योजना एकच हवी पण त्याचा लाभ दोघांनाही व्हायला हवी. असा व्यवस्थापनाची गरज आहे.

Wednesday, August 5, 2020

कणिसौनि कणु झडे । तो विरुढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ।। (एकतरी ओवी अनुभवावी)




निसर्ग हा आपला शत्रू नसून मित्र आहे हे त्याच्या लक्षातच नाही. जग चंद्रावर गेले. तुम्ही अद्याप सुधारला नाहीत. असे म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवण्यात आपण आघाडीवर आहोत. अहो पण, सुधारलो नाही म्हणजे नेमके काय केले व सुधारलो म्हणजे नेमके काय केले. जग चंद्रावर गेले. पण ते कशासाठी गेले. तेथे काय आहे हे तपासण्यासाठी गेले. 
-  राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

कणिसौनि कणु झडे । तो विरुढला कणिसा चढे ।
पुढती भूमी पडे । पुढती उठी ।। 253 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मग कणसांतून बीं पडतें त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येतें, पुन्हा त्या कणसांतील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाव्यांपासून कणसे उत्पन्न होतात.

देवराईमध्ये अनेक जातीचे वृक्ष वर्षानुवर्षे वाढतच राहतात. तेथे रोपे लावण्याची गरजही नसते. अनेक वनौषधींची वाढ त्या जागी होत असते. अनेक पठारावरही विविध प्रकारच्या वनस्पती वाढतात. सुंदर सुंदर फुले त्यांना येतात. विविध जातींच्या या वनस्पती दरवर्षी उगवतात. त्यांची लागण करण्याची कधी गरजही भासत नाही. दरवर्षी या वनस्पतींची नैसर्गिक वाढ होत असते. पावसाळ्यात या वनस्पती रुजतात. त्यांना फुले येतात. फळे लागतात. त्यांचे बीज त्याच जमिनीत पडते. पुन्हा पावसाला सुरू झाली की या वनस्पतींचे ते बीज फुलते. पुन्हा बहरते. असा हा क्रम वर्षानुवर्षे सुरू असतो. देवराईही अशी वाढते. पण सध्या मानवाच्या वसाहतीमुळे आता या पठारावरील वनस्पती नष्ट होत आहेत.

 मानसांचा वावर वाढल्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी तर या वनस्पती नष्ट झाल्या आहेत. केवळ पुस्तकामध्ये त्यांच्या नोंदी पाहायला मिळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या ह्या मानव जातीस घातक ठरणाऱ्या आहेत. निसर्गचक्रच धोक्‍यात येण्याचा संभव निर्माण झाला आहे. या दुर्मिळ होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन हे एक मोठे आव्हानच उभे राहात आहे. यावर उपाय योजण्याची गरज आहे. मानवाची आता निसर्गाशी स्पर्धा सुरू आहे. मानवाच्या वाढत्या गरजा ह्या समस्त मानव जातीसच धोका ठरत आहेत. यावर वेळीच सावध होण्याची गरज आहे. हा प्रश्‍न जरी जागतिक असला तरी कर्तव्य म्हणून तरी मानवाने आता सावध व्हायला हवे.

निसर्गाचे नियम मोडू लागले आहेत. याचा फटका मानवास बसतही आहे. कधी अतिवृष्टी होते तर कधी भीषण दुष्काळ पडतो आहे. जागतिक तापमानवाढीने अनेक वनस्पतींचे जीवनच धोक्‍यात आले आहे. नैसर्गिक वाढ आता कृत्रिम होऊ पाहात आहे. मानवाचे नैसर्गिक जीवन आता कृत्रिम होऊ लागले आहे. झाडाखाली गारवा होता. नैसर्गिक गारवा आता केव्हाच गेला आहे. पंखे आणि वातानुकूलित इमारतीमुळे बाहेरच्या जगात कितीही तापमानवाढ झाली तर त्याची चिंता मानवाला नाही. निसर्गात कितीही वाढ होवो आपण थंड जागी आहोत यातच मानवाला समाधान वाटत आहे. हे माझे कर्तव्य नाही. त्यासाठी पर्यावरण विभाग आहे. शासनाची खाती कार्य करत आहेत. उपाय योजत आहेत. असे म्हणून नागरिकांनी या प्रश्‍नांकडे डोळे झाक केली आहे.

विकासाचा वेग गाठणे हेच जीवनाचे उद्दिष्ट झाले आहे. डोळ्यावर विकासाच्या वेगाची झापड बसली आहे. ठेच लागत असली तरी त्यातून जागे होण्याचे भान त्याला नाही. निसर्गाचे चक्रच मोडीत निघाले आहे. याकडेही पाहायला त्याला वेळ नाही. जागरूकताही नाही. नैसर्गिक वनशेती धोक्‍यात आल्याने कृत्रिम वनाची गरज भासत आहे. पण वनांच्या निर्मितीचे नियोजनच ढासळल्याने पर्यावरणाचा समतोलही आता ढासळत आहे. नैसर्गिक पिकलेल्या फळाची गोडी ही कृत्रिम फळास नाही. हे माहित होऊनही त्याला नैसर्गिकरीत्या फळे पिकविण्यास वेळ नाही. फळ जलद पिकविण्यावरच त्याचा भर आहे. झाडाला फळ लागल्यानंतर ते झपाट्याने पिकावे यासाठी प्रयत्न होत आहेत. अशाने मानवाचा जन्मही तसाच झाला आहे. ऐन तारुण्यातच आता त्याला वृद्धाप्य येऊ लागले आहे. थांबायलाच वेळ नाही तर तो काय करणार? मानसाचा विचार बदलला आहे. तारुण्यात डोक्‍याचे केस पांढरे पडू लागले आहेत.

फळाला लवकर पक्वता आणण्याच्या तंत्राने मानवी आरोग्यावरही परिणाम होतो आहे. याकडे पाहायलाही मानवाला वेळ नाही. आता कोण त्याला समजावणार? आणि तो कोणाचे ऐकणार? चुका होत आहेत हे त्यालाही समजते पण काळच असा आला आहे. विकासाचा वेग त्याला साद देत आहे. यातच तो गुरफटला आहे. विकासाच्या वेगाचा मोह केव्हा जाणार? आणि कसा जाणार? हाच मोठा प्रश्‍न आहे. विकास हवा, विकास हवा पण कसला विकास हेच तर नेमके त्याला समजत नाही. निसर्गाशी सुरू असलेल्या या स्पर्धेत त्याचा पराभव निश्‍चित आहे. पण तरीही तो लढतो आहे. आपण का लढतो आहोत? कशासाठी लढतो आहोत? याचे भानच त्याला नाही.

निसर्ग हा आपला शत्रू नसून मित्र आहे हे त्याच्या लक्षातच नाही. जग चंद्रावर गेले. तुम्ही अद्याप सुधारला नाहीत. असे म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवण्यात आपण आघाडीवर आहोत. अहो पण, सुधारलो नाही म्हणजे नेमके काय केले व सुधारलो म्हणजे नेमके काय केले. जग चंद्रावर गेले. पण ते कशासाठी गेले. तेथे काय आहे हे तपासण्यासाठी गेले. पृथ्वीची या विश्‍वाची निर्मिती कशी झाली हे शोधण्यासाठी ते गेले. निसर्ग निर्मित हे विश्‍व आहे. यातील प्रत्येक सजिवाला येथे जगण्याचा अधिकार आहे. यासाठी त्याला नैसर्गिकरीत्या संरक्षणही निसर्गाने दिले आहे. कोणत्याही जीव घ्या? त्याला निसर्गाने ही देणगी दिली आहे. संशोधनही मानवाच्या भल्यासाठीच केले जात आहे.

पृथ्वीच्या विनाशासाठी कोणतेही संशोधन नाही. पण मानसाच्या तामसीवृत्ती विनाशच हवा आहे. हव्यासापोटी तो विनाश करू पाहात आहे. मग निसर्गाचे संरक्षण करणारे सुधारणावादी विचाराचे नाहीत असे कसे? सुधारणा कशाला म्हणायचे हेच आधी समजून घ्यायला हवे. विकासही विचारात घ्यायला हवा. आरोग्य धोक्‍यात जात आहे हा विकास कसा असू शकेल? विकासाच्या नावाखाली विध्वंस होत आहे. हे मानवाला समजतच नाही. आरोग्याला घातक रसायने फवारून पिकातून विषाचे उत्पन्न काढत आहोत. असे शेतकऱ्यांना का वाटत नाही? हेच आपण खात आहोत.

आपल्या पुढच्या पिढ्याही यामुळे धोक्‍यात आल्या आहेत. याचे भानही त्याला नाही. कमीत कमी स्वतःच्या कुटुंबासाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक उत्पादने घ्यायला नकोत का? निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्‍चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून घेऊन नैसर्गिक शेतीचा, सेंद्रिय शेतीचा विकास शेतकऱ्यांनी करायला हवा व निसर्गाचा हा ठेवा जपायला हवा. अनेक उद्योग उभे राहतील पण ते बंदही पडतील. पण शेती हा असा उद्योग आहे. जो कधीही बंद पडत नाही. तो कधी तोट्यात जाईल पण नफ्यातही राहील. पण हव्यासापोटी अधिक नफा कमविण्यासाठी विषारी उत्पादने घेणे हे गैर आहे. याचा फटका स्वतःलाही बसतो याचा विचार हवा. यासाठीच नैसर्गिक शेतीचा अवलंब हवा.

Tuesday, August 4, 2020

तुळसीमाहात्म...


बदलत्या शेती पद्धतीत शेतकऱ्यांनी तुळशीची लागवड करणे उपयुक्त ठरू शकते. शहरातील वाढते प्रदूषण विचारात घेता घरोघरी तुळस हा उपक्रम राबविला जाणे गरजेचे आहे. भावी काळात याची गरज निश्‍चितच पडणार आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा ।
परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ।। 183 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - तुळशीच्या झाडाचें तर उत्तम प्रकारचे संरक्षण करावे. परंतु त्या संरक्षण करण्यांत फळांचा, फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसावा.

भारतीय संस्कृतीत तुळशीला अमृत संजीवनी म्हटले आहे. वारकरी स्त्रिया डोक्‍यावर तुळस घेऊन वारी करतात. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. ती लक्ष्मी समजली जाते. वारीमध्ये भक्ती बरोबरच लक्ष्मी आणि ऐश्‍वर्य लाभते. यासाठीच वारीत तुळस नेहमी बरोबर ठेवण्याची प्रथा आहे. संत तुकाराम महाराज यांनी यासाठीच म्हटले आहे जयाच्या अंगणी तुळस । त्याचा यात्रेचा कळस ।। अध्यात्मात तुळशीला असे महत्त्व आहे. बेल हे शंकरास प्रिय आहे. फळ आणि कमल हे लक्ष्मीप्रिय आहे. तर तुळस ही विष्णूप्रिय समजली जाते.

सृष्टीचा निर्माता विष्णू हा शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करतो. यामुळे त्याला थंडी व सर्दीचा त्रास होतो. तो त्रास घालविण्यासाठी सर्दीहारक, कफहारक तुळशी त्याला लागते म्हणून विष्णूस तुळस प्रिय आहे असेही म्हटले जाते. अध्यात्माचा अभ्यास करताना त्यात दडलेले शास्त्रही समजून घेणे आवश्‍यक आहे. भारतीय संस्कृती ही शास्त्रावर आधारित आहे. तुळसीमागेही असेच शास्त्र आहे.

तुळस ही हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य करते. आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या काळात तर तुळशीला अधिक महत्त्व द्यायला हवे. प्रत्येकाच्या घरी तुळस ही हवीच. शहरात असो व मोठ्या वसाहतीमध्ये असो तुळस ही घरी हवीच. वाढत्या प्रदूषणाच्या काळात आता अशा वनस्पतींची गरज नाही का? तुळशीचे हे विविध गुणधर्म विचारात घ्यायला हवेत. गुणधर्मावरूनही तुळशीस विविध नावे पडली आहेत. रस उपयोगी असल्याने किंवा देवदेवतांना अर्पण करीत असल्याने तुळशीला सुरसा असेही म्हटले जाते. जंतुनाशक असल्याने अपेतराक्षसी, भूतघ्नी असे म्हटले जाते. दुंदुभिप्रमाणे लांब मंजिरी असल्याने बहुमंजरी, देवदुंदुभि असेही नाव आहे. घराघरात लावली जात असल्याने सुलभा, ग्राम्या असेही संबोधले जाते.

भारतात तुळशीच्या विविध जाती आढळतात. त्यात पवित्र तुळस, काळी तुळस, रामतुळस, कर्पुरतुळस, सब्जातुळस, दहिंद्र तुळस, लवंगी तुळस, मरवा तुळस अशा जाती आढळतात. सध्या रसायनांच्या फवारण्याकरून कीटकांचा, डासांचा नाश केला जातो. पण डास आता अशा फवारण्यांना प्रतिसाद देत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशावर तुळशीची लागवड ही उपयुक्त ठरू शकते. तुळस ही जंतुहिन आहे. डास व इतर कीटकांचा ती नाश करते. तुळशीजवळ डास फिरकू शकत नाहीत. तुळशीचे अस्तित्व असते तेथे डासांचे अस्तित्व नष्ट होते. झोपताना पाने व मंजिरीचा रस अंगाला लावून झोपल्यास डासांचा त्रास होत नाही.

तुळशीच्या रसाने त्वचाविकारही दूर होतात. साबनाऐवजी तुळशीचा रस लावून अंघोळ केल्यास त्वचाविकार दूर होतात. या रसात लिंबाचा रस घातला तर ते मिश्रण अधिक फायदेशीर ठरते. काहींना गोड, थंड पदार्थ खाताना वेदना होतात. दातांना थंड पाणी लागले तरीही वेदना होतात. अशी व्यक्तींनी तुळशीची पाने व मिरे एकत्र करून तो गोळा दातात ठेवावा. यामुळे दंतशूल कमी होते. गांधीलमाशी किंवा इतर किड्यांनी दंश केला असता तुळशीची पाने व झेंडूचा रस लावावा यामुळे आग कमी होऊन शांत वाटते. बऱ्याचदा जखमा बऱ्या होत नाहीत. अशा व्रणावर तुळशीची पाने वाटून तयार केलेले चूर्ण लावावे. व्रण सुकून बरा होतो. तोंडावर काळे डाग पडले असतील तर रोज रात्री तुळशीची पाने दुधाबरोबर बारीक वाटून ते मिश्रण तोंडास लावावे काळे डाग नष्ट होतात.

ज्यांना सारखा दम लागतो. चालताना सुद्धा त्रास होतो. चढ चढताना किंवा जिना चढताना देखील त्रास होतो त्यांनी तुळशीचा रस एक चमचा, माक्‍याचा रस पाव चमचा व आल्याचा रस एक चमचा घेऊन एकत्र करावा त्यामध्ये मध, साखर घालून हे मिश्रण रोज घेतल्यास थकवा दूर होतो. ज्या तापाच्या प्रकारामध्ये कडकडून थंडी वाजून ताप येतो. अशावेळी तुळशीचा उपयोग होतो. लहान मुलांना दात येताना त्रास होतो त्यासाठी डाळिंबाच्या रसासोबत तुळशीचा रस व मध एकत्र घ्यावा यामुळे दात येण्याच्यावेळी त्रास होत नाही. कर्करोगावरही आता तुळस उपयुक्त ठरत आहे. असे संशोधकांचे मत आहे. असे अनेक औषधी उपयोग आहेत.

अमृत संजीवनी असणाऱ्या अशा या वनस्पतीची लागवड करणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या शेतीच्या पद्धतीत औषधी वनस्पतींची लागवडही केली जात आहे. तुळशीच्या पानात 0.5 ते 0.7 टक्के पिवळे जर्द, किंचित लवंगेसारख्या वासाचे बाष्पनशील तेल असते. कृष्ण तुळशीच्या तेलात प्रामुख्याने युजेनॉल हे रासायनिक घटक द्रव्य असते. यासाठी तुळशीची लागवड केली जाते. तुळस ही वर्षभर उत्पन्न देते. मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिन तुळशीस उपयुक्त असते. हेक्‍टरी अंदाजे 75 ते 250 ग्रॅम बियाणे लागते. साधारण तीन कापण्या या पिकाच्या मिळतात. पीक फुलोऱ्यावर असताना जमिनीच्या वर 20 ते 25 सेंटीमीटर अंतर सोडून पहिली कापणी करावी. नंतरच्या दोन कापण्या 75 ते 90 दिवसाच्या अंतराने कराव्यात. कापलेले संपूर्ण ओले पीक सावलीत वाळवावे म्हणजे तेलाचे प्रमाण वाढते. हेक्‍टरी साधारणपणे 15 ते 25 टन ओला पाला मिळतो. तर 100 ते 110 किलो तेल मिळते.

बदलत्या शेती पद्धतीत शेतकऱ्यांनी तुळशीची लागवड करणे उपयुक्त ठरू शकते. शहरातील वाढते प्रदूषण विचारात घेता घरोघरी तुळस हा उपक्रम राबविला जाणे गरजेचे आहे. भावी काळात याची गरज निश्‍चितच पडणार आहे. वाढते तापमान आणि वाढते प्रदूषण अशा समस्यावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पण याकडे दुर्लक्ष होताना दिसते. वाढते आजारांचे प्रमाण विचारात घेऊन तरी जनतेने जागृत व्हावे असे वाटते. शहर असो वा ग्रामीण भाग प्रदूषणाची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. यासाठी तुळशीची निरपेक्ष भावनेने जोपासना घरोघरी करायलाच हवी.