Sunday, May 16, 2010

शिवाजी महाराज यांचे गुरु मौनी महाराज


शिवाजी महाराज यांचे गुरु मौनी महाराज

मौनी महाराज हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते. त्यांचा मठ आणि समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्‍यातील पाटगाव येथे आहे. मौनी महाराज यांचे मुळ नाव काय होते तसेच ते कोण होते, कोठून आले याबाबत काहीच माहीती उपलब्ध नाही. आम्ही या विषयावर अभ्यास करत आहोत. मौनी महाराज यांचे अध्यात्म याचा अभ्यास आम्ही आत्मज्ञानी पुरुषांच्या मागदर्शनाखाली करत आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचेही अध्यात्मिक विचार याचाही अभ्यास करत आहोत. जर आपणास याबाबत काही माहिती असल्यास आपण आम्हास जरुर कळवावी.तत्पुर्वी आपण आमची www.freewebs.com/mounimaharaj/ ही वेबसाईट अवश्‍य पाहावी.