Sunday, August 23, 2020

समाधीपाद - मनावर ताबा मिळवण्याची प्राणायाम

 

समाधिपाद सूत्र-३४ प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य


प्रच्छर्दनविधारणाभ्यां = नाकावाटे बाहेर फेकणे आणि रोखून धरणे, अशा दोन्ही प्रकारे किंवा प्राणस्य - कोठ्यातल्या वायूच्या आधारे मनावर ताबा मिळवता येतो. याचा अर्थ प्राणायामाद्वारे मनावर ताबा मिळवावा.

प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पूरक-आत घेणे. रेचक-बाहेर सोडणे;

 पूरक -आत घेणे, कुंभक- रोखून धरणे, रेचक-बाहेर सोडणे, हे दोन प्रकार लोकांच्या परिचयाचे आहेत. यांव्यतिरिक्त अनुलोम विलोम, भस्रिका, कपालभाती, अग्निसारक्रिया हे प्राणायामाचे इतर प्रकार सुद्धा करून बघता येण्यासारखे आहेत. जाणत्यांच्याकडून ते प्राणायाम शिकून घेऊन रोज त्याची अंमलबजावणी करावी आणि मनावर ताबा मिळवावा. आजकाल योगाचा भरपूर प्रसार झालेला आहे. त्यामुळे प्राणायाम शिकवणाऱ्यांची कमतरता नाही. फक्त तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घेणे महत्त्वाचे!.  

 दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यंदा मला:.

तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषा:प्राणस्य निग्रहात्.  

ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात येताच धातूंमधील घाण निघून जाते, त्याप्रमाणे प्राणाच्या मदतीने इंद्रियांचे दोष सुद्धा नाहीसे होतात.

- डॉ अ. रा. यार्दी, धारवाड

For details download Iye Marathichiye Nagari app

Search Iye Marathichiye Nagari on Google Play Store

OR

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari


No comments:

Post a Comment