Sunday, December 13, 2020

२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती



२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती   

४ मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती  आकाशा मध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री ९ वाजून १५ मिनिटापर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली.

श्री. कारंजकर म्हणाले, या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो .उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबर ला सूर्याचे उत्तरायण चालू होते.अशा दोनी गोष्टींचा समस्त खगोल प्रेमीसह नागरिकांना आनंद घेता येणार आहे.

श्री. कारंजकर म्हणाले, आपल्या सूर्य मालेतील पाचवा व सगळ्यत मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आप्पापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. गुरु ग्रहाला सूर्यभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी ९ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो.शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यसाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास १० तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो .हे दोनी ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात कि पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांच्या ऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. इंग्रजी मध्ये याला कॉन जंकशन असे म्हणतात.असे जरी असले तरी ते ग्रह एकमेकांपासून फार लांब अंतरावरती असतात.गुरुचे पृथ्वी पासूनचे अंतर यावेळेस ५ पूर्णांक ९२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे तर शनीचे अंतर १० पूर्णांक ८२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे.म्हणजेच ते एकमेकांपासून ४ पूर्णांक ९० अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे अंतर लांब आहेत. एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८७१ किलोमीटर. १५ डिसेंबर पासून संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर हे दोन्ही ग्रह  पश्चिमे कडे रात्री ९वाजून १५ मिनिटापर्यंत आपण पाहू शकता. वरच्या बाजूला असणारा ग्रह शनी तर त्याच्या खालच्या  बाजूला असणारा ग्रह गुरु आहे .२१डिसेंबर ला ते एकमेकांच्या जवळ म्हणजेच ते एकमेकां पासून 0.1 डीग्री म्हणजेच आपल्या चन्द्राच्या व्यासाच्या १ पंचमांश पट अंतर एवढे शेजारी असल्यासारखे दिसणार आहेत.या तारखे नंतर मात्र ते पश्चिम दिशेला  एक्मेखापासुन लांब जाताना दिसणार आहेत यावेळी मात्र त्यांचं क्रम बदलनार  आहे.यानंतर असाच सोहळा बगण्यासाठी आपणाला १५ मार्च २०८० सालापर्यंत वाट बगावी लागणार आहे.या तारखेला याच्यापेक्षा जास्त चांगली स्थीती पूर्वे दिशेला पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी पाहावयास मिळणार आहे.

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची संधी...

 इंटरनॅशनल स्पेस स्टेशन  पाहण्याची संधी...

आयएसएस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन डोळ्यांनी काही मिनिटांकरिता पाहावयास मिळणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातील खगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली. 

श्री. कारंजकर म्हणाले, हे स्पेस सेन्टर पृथ्वी भोवती ९० मिनिटामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते .त्याचा वेग एका तासाला १७ हजार ५०० मैल म्हणजे २८ हजार किलोमीटर एवढा असतो. स्पेससेंटर वरती पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने हे स्पेस सेंटर पाहावयास मिळणार आहे. हे बघत असताना विमान अथवा मोठा तारा आकाशामधून जात आहे, असे दिसते. याची क्षितिजावरून असणारी उंची डिग्री अथवा इलेव्हशनमध्ये मोजली जाते, असे श्री. कारंजकर यांनी सांगितले.

या दिवशी यावेळी दिसणार स्पेस स्टेशन...

१४ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजून २२ मिनीटांपासून  ५ मिनिटाकरिता पश्चिम वायव्य दिशेकडून ११ डिग्री उंचीवरून दक्षिणदिशे कडे १० डिग्री उंचीकडे जाणार आहे.

१७ डिसेंबरला सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून सहा मिनिटाकरता दक्षिण नैऋत्य दिशेकडून १० डिग्री उंचीवरून  पूर्व ईशान्य दिशेकडे १० डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१८ डिसेंबरला पहाटे ५ वाजून २० मिनटापासून एक मिनिट करिता  १० डिग्री उंचीवरून दक्षिण आग्नेय दिशेकडून १० डिग्री उंची वरून आग्नेय दिशेकडे १४ डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१९ डिसेंबर ला पहाटे ६ वाजून ८ मिनटापासून सहा मिनिटांकरिता १० डिग्री उंचीवरून पश्चिम नैऋत्य दिशेकडून उत्तर ईशान्य दिशेकडे ११ डिग्री उंचीवरून जाणार आहे .

२० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपासून ३ मिनिटांकरिता पूर्व आग्नेय दिशेकडून हे स्पेस सेंटर ११ डिग्री उंचीवरून ईशान्य दिशेकडे जाणार आहे,

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


Saturday, December 12, 2020

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूरः  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय 20 जानेवारी 2021 पर्यंत पोचतील, अशा रितीने पाठवावीत. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन आणि बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही ) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जातील. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे असेल.  पहिल्या अक्षरसागर साहित्य संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

संपर्क - राजन कोनवडेकर (अध्यक्ष)  9822226458,  प्रा. डाॅ. अर्जुन कुंभार (उपाध्यक्ष) 9890156911, डाॅ. मा. ग. गुरव (सदस्य)  9421114262   

पुस्तके पाठवणेचा पत्ता -  बा. स. जठार, सचिव,  अक्षरसागर साहित्य मंच, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - 416209. मो. 9850393996,    9403466256   

डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड


 डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड केली आहे. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही राज्यातील नामांकित संस्था असून फेलोच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील शास्त्रज्ञांचा त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाते. या यादीमध्ये सन २०२० यावर्षासाठी शिवाजी विद्यापीठातून प्रा. गरडकर यांची एकमेव निवड झाली आहे.

प्रा. गरडकर हे नॅनोमटेरिअल्स या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी पाण्यातील रंगद्रव्यांचे विघटन सूर्यप्रकाशाच्या मदतीने करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही रंगद्रव्य फक्त अर्ध्यातासामध्ये जवळपास ९५ टक्के नष्ट केली आहेत. तसेच त्यांची राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर एकूण १५० शोधपत्रिका प्रकशित झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी मिळाली असून सध्या ८ विद्यार्थी नॅनोमटेरिअल्स या विषयावर कार्य करीत आहेत. सध्या ते डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

प्रा. गरडकर यांना संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची २०१८ सालीची शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. तसेच ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळात संपादक व परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामातील तत्परता पाहून अमेरिकन केमिकल सोसायटी सारख्या अनेक नामवंत प्रकाशकांनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. संशोधनातील उत्तम गुणवत्ता मूल्यांकन हे एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स, व सायटेशन यांच्या आधारे केले जाते. त्यानुसार प्रा. गरडकर यांच्या संशोधनाचा एच इंडेक्स ३५ , आय-१० इंडेक्स ८५, व सायटेशन्स ३७०० इतकी आहेत.

Friday, December 11, 2020

स्त्रीचे प्रेम



स्त्रीचे प्रेम 

स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्सें घरीं । 

तैसें प्रेम एथिचें करी । स्थानपती ।। 635।। अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ ः अथवां गाय डोंगरात चरत असते परंतु तिचें सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहीलेले असते त्याप्रमाणे या विश्वरुप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. 

स्त्री लग्नानंतर सासरी जाते, पण तेथे माहेरच्याच गोष्टींचे गोडवे गात राहाते. माझ्या माहेरात हे आहे. माझ्या माहेरात ते चांगले आहे. जरी अठराविश्व दारिद्य माहेरात असले तरी तिच्या मनात माहेर विषयी आपुलकी असते. तिच्या मनात माहेर कायमचे घर करून राहीलेले असते. हे मातृप्रेम आहे. ही मायेची ओढ आहे. हा जिव्हाळा आहे. माहेरची माया ती कधीही विसरू शकत नाही. सासरी ऐश्वर्य जरी असले तरी माहेरच्या प्रेमातच त्या स्त्रीचे मन गुंतलेले असते. हे प्रेम का असते ? ही ओढ का असते ? प्रेमाच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी आपले मन ओढले जात असते. ते आपण कधीही विसरू शकत नाही. पैसा, संपत्ती अमाप मिळाली, ऐश्वर्य ओसंडून जरी वाहत असले तरी प्रेमाने मिळालेली चादर, आधार  केव्हाही आपल्या मनातून दूर जात नाही. ती आठवण कायमची स्मरणात असते. म्हणूनच स्त्री कधीही माहेर विसरू शकत नाही. कारण त्या प्रेमात ती गुंफलेली असते. आजकाल स्त्रिया सुद्धा पुरूष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कामानिमित्त त्या कोठेही असल्यातरी त्यांचे लक्ष घरातील तान्हुल्याकडे कायम असते. पाळणाघरात तिचे संगोपन योग्यप्रकारे होत असले तरीही त्या मायेच्या मनात मात्र त्या तान्हुल्याची ओढ असते. इतकेच काय बाहेर बाजारात खरेदीसाठी गेल्या तरी त्यांच्या मनात घरास कुलुप निट लावले आहे का? घरातील गॅस बंद केला आहे का ? असे विविध प्रश्न सुरु असतात. इतक्‍या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनात घर करून राहीलेल्या असतात. त्यांची घराची ओढ ही कायम असते. गाय चरायला डोंगरावर गेली तरी तिचे लक्ष चरतानाही गोठ्यातील वासराकडे असते. हे मातृप्रेम आहे. पक्षी सुद्धा तिच्या पिलाला खाद्य आणण्यासाठी बाहेर गेला तरी पंख न फुटलेल्या घरट्यातील पिलाकडेच मन असते. ही ओढ कायम असते. हे प्रेम कायम असते. अध्यात्मात सद्‌गुरुंना अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. कुठेही बाहेर गेलात तरी भगवंताचे स्मरण नित्य असायला हवे. त्याच्याकडे अशी ओढ असायला हवी. येणाऱ्या अनुभुतीकडे अवधान असायला हवे. मन सतत भगवंताकडे ओढलेले असावे. मनात साधनेचा विचार असायला हवा. कारण साधना ही नित्य सुरु असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. मन सदैव त्यामध्ये गुतलेले असावे. सो ऽ हमचा स्वर नित्य सुरु असतो. पण आपले लक्ष त्याकडे नसते. त्यामध्ये मन गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर सतत स्मरणात असायला हवा. त्याचे ध्यान सतत सुरू असायला हवे. तो ऐकायला हवा. तरच आपण आत्मज्ञानाकडे ओढले जाऊ. सद्‌गुरुंच्या कृपेने आपणास आत्मज्ञानी होता येते. यासाठी तशी ओढ साधनेत कायम असायला हवी. स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. स्त्रीची ओढ माहेरी जशी असते तशी अध्यात्माकडे आपली ओढ असायला हवी. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा.  

Wednesday, December 9, 2020

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

 


सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी) 

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरू ।

ऐसे म्हणो नि अव्हेरू । करणें घडे ।। 625 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ ः एखाद्या मनुष्यास सोन्याचा डोंगर प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला घेता येत नाही असे म्हणून सोन्याच्या डोंगराचा त्याग करणे घडेल काय ?

आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होत असते.  कधी ती धनाच्या स्वरुपात असते तर कधी स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात असते. फुकट मिळालेल्या गोष्टीचे मोल आपणाला फारसे नसते. पण योग्यवेळी एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ती गोष्ट आपणासाठी अनमोल ठरते. या वस्तू आपणास भेट स्वरुपात मिळतात. कोणी प्रेमाने देतात. तर कोणी मदत म्हणून देत असतात. त्यातही त्याची आपल्याबद्दल आपुलकी असते. आई वडील मुलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटवस्तू देतात. सद्गुरु सुद्धा प्रेमाने शिष्याला अशा भेट वस्तू देत असतात. मित्र मैत्रिणीसुद्धा आपणास प्रेमाने भेट वस्तू देत असतात. आपण या भेट वस्तू स्वीकारतो. कारण आपले प्रेम असते. एक मैत्रीचे, जिव्हाळ्याचे भावनिक नाते असते. प्रेमापोटी आपण या वस्तू स्वीकारतो. याचा त्याग केला तर देणाऱ्याला याचे निश्चितच दुःख होईल. विश्वरुप दर्शनात तर भगवंत अर्जुनाला संपूर्ण राज्य तुझ्याकडे चालुन आले आहे. असे सांगत आहेत. याचा त्याग करून चालणार नाही ते शोभणारही नाही. याचा त्याग करून युद्धभुमी सोडून गेलास तर अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला असे शत्रू म्हणतील. यासाठी याचा त्याग करणे अयोग्य आहे. असे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. कारण मिळाले आहे त्याचा स्वीकार करणे हाच धर्म आहे.  

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.  प्रेमाचा अनादर करणे हे धर्माला शोभणारे नाही. सद्गुरु सुद्धा इच्छा नसतानाही भक्तांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करत असतात. उपयोग नाही म्हणून त्याचा त्याग करत नाहीत. प्रेमाने अनेक गोष्टी साध्य होतात. चार प्रेमाचे शब्दही जीवनात मोठा बदल घडवू शकतात. मग प्रेमाने दिलेली भेट वस्तू तुमचे जीवन का बदलवू शकणार नाही ? दुष्टाच्या मनातील दुष्टपणाही प्रेमाने नष्ट करता येतो. दुरावलेल्यांना प्रेमाने जवळ करता येते. यासाठी बोलण्यात, वागण्यात प्रेमाचे चार शब्द असावेत. 

प्रेम ही भक्तीची महत्त्वाची पायरी आहे. अध्यात्मिक विकासातही त्याला महत्त्व आहे. साधनेमध्ये मन स्थिर ठेवण्यास प्रेमाची मोठी मदत होते. प्रेमामुळे मनाचा उत्साह कायम राहातो. सद्गुरुंच्याजवळ तर प्रेमाचा सागरच असतो. या सागरात आपण डुंबायला शिकले पाहीजे. प्रेमाने आंघोळ करून मन स्वच्छ करायला हवे. मनाची स्वच्छता ही अध्यात्मिक विकासासाठी गरजेची आहे. साधना करताना भक्ताला अनेक अनुभव येतात. प्रेमाने सद्गुरु हे शिष्याला शिकवत असतात. साधनेतून आत्मज्ञानाचा लाभ झाला तर त्याचा त्याग करून कसे जालेल. 

एखादी गोष्ट आपणास त्रास देत असेल. कटकटीची असेल तर ती आपण सोडून दिली पाहीजे असे वाटते. पण त्याचा त्याग केला तर ती कटकट कायमची मिटते असे होत नाही. ती कटकट कधी ना कधी त्रासदायक ठरते. यासाठी त्याग न करता आहे त्याचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. यासाठी त्याग कशाचा करायचा या अभ्यास करायला हवा. त्याग केल्याने समस्या सुटतात असे होत नाही. त्या बळावतात. यासाठी ती समस्या सोडवण्याकडे आपला कल असायला हवा. सोन्याचा डोंगर मिळाला. कदाचित हा त्रासदायकही ठरू शकतो. यातून सोने काढता येणे शक्यही नाही. मग हा घेऊन आपण काय करायचे असे म्हणून आपण त्याचा त्याग केला तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून त्यातून विकास करायला शिकले पाहीजे. अध्यात्मिक प्रगती ही टप्प्याने होत असते. सोन्याचा डोंगर मिळाला म्हणजे सर्व काही मिळाले असे होत नाही. आत्मज्ञान झाले तरी त्याचा वापर कसा करायचा याचे ज्ञान असायला हवे. यासाठी मिळाले आहे त्याचा स्वीकार करून वाटचाल करायला हवी. 

   ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा. 

Tuesday, December 8, 2020

ध्यानरुपी संपत्ती


सकारात्मक विचारानेच अध्यात्मिक प्रगती होत राहाते. प्रत्येकाला होणारा लाभ वेगळा आहे. यासाठी आपल्या समाधानासाठी तो लाभ मिळतो. म्हणून ध्यानधारणा नित्य करायला हवी. ध्यारुपीसंपत्तीचा लाभ, ध्यानाची अनुभुती यावी यासाठी अवधान ठेऊन प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

आजि ध्यानसंपत्ती लागी । तूंचि एकू आथिला जगी । 

हें परमभाग्य आंगी । विरंचीही नाहीं ।। 622 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - आज ध्यानरुप संपत्तीकरिता जगांत तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. 

ध्यानामध्ये अनुभुती येते. हे भाग्य एखाद्यालाच सद्गुरुकृपेने भेटते. सद्गुरु हजारो शिष्यांना अनुग्रह देतात. पण प्रत्येक शिष्याला लाभ मात्र वेगवेगळा मिळतो. जो जे वांछिल तो ते लाहो ज्याला जे हवे ते त्याला मिळावे असे पसायदान अर्थात प्रसाद माऊलीने सद्गुरुंकडे मागितला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याला त्याचे फळ मिळत असते. ध्यानामध्ये कोणाला अनुभुती येते. कोणाला स्वप्नातून अनुभुती येते. हाताची पाचही बोटे सारखी नाहीत. तशी प्रत्येक माणसाची विचारसरणी ही भिन्न आहे. प्रत्येकाची इच्छाही वेगवेगळी असते. कोणाला नोकरीत प्रमोशन हवे असते. तर कोणाला अमाप संपत्ती हवी असते तर कोणाला सुख समाधान हवे असते. प्रत्येकाची साधना एकच आहे पण विचारामुळे फळ मिळते. मनाची शांती मिळावी यासाठी जो प्रयत्न करतो. सद्गुरुकृपेने त्याला ते फळ प्राप्त होते. विश्वरुप दर्शन हे अर्जुनाला झाले. संजयालाही झाले पण अर्जुनासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले. हे भाग्य केवळ अर्जुनालाच मिळाले. अन्य व्यक्तीला याचा लाभ झाला नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा वेगळी असते त्यानुसार त्याला लाभ मिळतो. सद्गुरुकृपेने हा लाभ होतो. सद्गुरु हजारोंना अनुग्रहीत करतात पण एखादाच आत्मज्ञानाचा लाभार्थी होतो. परंपरा पुढे नेणारा एखाद-दुसराच असतो. हे भाग्य सद्गुरुकृपेने लाभावे यासाठी ध्यानधारणा आहे. ध्यानरुपी संपत्तीचा हकदार होण्यासाठी नित्यनेमाने साधना करायला हवी. कारण त्या हजारोमधील लाभार्थी आपणही असू शकतो. हाच भाव मनात ठेऊन साधना करायला हवी. ते मिळणार नाही असा नकारार्थी विचार सोडून द्यायला हवा. सकारात्मक विचारानेच अध्यात्मिक प्रगती होत राहाते. प्रत्येकाला होणारा लाभ वेगळा आहे. यासाठी आपल्या समाधानासाठी तो लाभ मिळतो. म्हणून ध्यानधारणा नित्य करायला हवी. ध्यानरुपीसंपत्तीचा लाभ, ध्यानाची अनुभुती यावी यासाठी अवधान ठेऊन प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. ते परमभाग्य आपणाला निश्चित मिळेल असा विश्वास मनात ठेऊन वाटचाल करायला हवी. तरच अध्यात्मिक प्रगती होईल. 


Saturday, November 28, 2020

वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी).

 


वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी). 

सर्व प्राणीमात्रात ही ऊर्जा आहे. त्यांच्या पोटात असणारा जठराग्निही त्याचेच रुप आहे. अन्न पचवण्याची ताकदही त्याच्यापासूनच मिळते आणि त्या अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा ही सुद्धा त्याचेच रूप आहे.... वाचा सविस्तर इये मराठीचिये नगरी ऍपवर

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

यासह अध्यात्मिक विचार, लेख वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

 Search iye Marathichiye Nagari App on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, November 17, 2020

कोकण किनारपट्टीवर जेली फिश (व्हिडिओ).

 


कोकण किनारपट्टीवर जेली फिश (व्हिडिओ). 

 See on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari App on Google Play Store and
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

ऊठ, जागा हो अन्... ( एकतरी ओवी अनुभवावी )

 


ऊठ, जागा हो अन्... ( एकतरी ओवी अनुभवावी ) 


शोक करत बसण्यात काहीच अर्थ नाही. यातून बाहेर पडायला हवे. आज इतक्या माळा साधना केली. उद्या तितक्या माळा साधना करायची आहे. असे करण्यापेक्षा दोन सेकंदाचे स्मरणही सर्व साधनेला मागे टाकते. दोन सेकंदाचे अवधान सर्वांवर उपयुक्त ठरते. यासाठी साधनेतील या गोष्टींचा अभ्यास करून त्यात आपण आपली प्रगती साधायला हवी.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

म्हणौनि वहिला उठी । मियां मारिले तूं निवटी । 
न रिगे शोकसंकटी । नाथिलिया ।। 477।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - म्हणून लवकर ऊठ, मी यांस ( आंतून ) मारले आहे व तूं यांस बाहेरून मार आणि नसत्या शोकसंकटात पडूं नकोस. 

सविस्तर वाचण्यासाठी इये मराठीचिये नगरी हे अॅप डाऊनलोड करा. 

Search Iye Marathichiye Nagari App on Google Play Store And Download

वाचा सविस्तर विश्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 


Monday, November 16, 2020

सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी : डाॅ. राजीव व्हटकर

 


सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सिंह राशीतून  होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी ३० नोव्हेंबर मिळणार आहे.  मंगळवारी ( ता. १७ ) आणि बुधवारी (ता. १८) रात्री सर्वाधिक उल्कावर्षाव अनुभवण्याची मिळणार आहे. त्यामुळे आजची रात्र अवकाश संशोधक आणि नागरिकांसाठी पर्वणीची ठरणार आहे, अशी माहिती पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.

श्री. व्हटकर म्हणाले, टेम्पल-टटल धूमकेतूने सोडलेल्या धुळीकानाच्या पट्ट्यातून जेव्हा पृथ्वी जाते तेव्हा हे धुळीचे कण पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात. पृथ्वीपासून १२० ते ८० किलोमीटरच्या दरम्यान वातावरणातील हवेच्या बरोबर झालेल्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते, त्यावेळीच त्यांचा वेग ताशी ११ ते ७२ किमी प्रति सेकंद इतका असतो. साधारणपणे  १० ते १५ सेकंदापर्यंत ह्या उल्का जमिनीच्या दिशेने येताना आपल्याला दिसतात. त्यानंतर त्यांचे राखेत रूपांतर होते. त्यातील काही मोठ्या आकाराच्या उल्का संपूर्णपणे न जळता जमिनीपर्यंत पोहोचतात.  

श्री. व्हटकर पुढे म्हणाले, हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी निरभ्र आकाश, सिंह राशी ओळखण्यासाठी आकाश नकाशा व सहनशीलतेची गरज आहे. सर्वप्रथम शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर व उंच ठिकाण निवडावे जेणेकरून स्वच्छ आणि संपूर्ण आकाश दिसेल. शक्यतो एखाद्या उंच इमारतीच्या छतावरुन निरीक्षण करावे. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी काही तास लागणार असल्याने बसण्यासाठी खुर्ची किंवा झोपून निरीक्षण करण्यासाठी चटई इत्यादींचा उपयोग करावा. आकाश नकाशाच्या साहाय्याने सिंह राशी ओळखून त्या दिशेने निरीक्षण करत राहावे. तासाला साधारणपणे १५ उल्का सिंह राशीच्यामधुन बाहेर पडताना दिसतील. सूर्य मावळल्यापासून ते पहाटे सूर्योदयापर्यंत हा उल्कावर्षाव ३० नोव्हेंबरपर्यंत पाहता येईल, असेही श्री. व्हटकर म्हणाले. 

Thursday, November 12, 2020

शिवाजी विद्यापीठातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल




शिवाजी विद्यापीठातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापिठातील वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आज पुणे शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कोल्हापुरातील एका स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ते शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांशी जिव्हाळ्याचे  संबंध या जोरावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंपरागत असलेला राजकीय आणि सामाजिक वारसा तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले जवळचे संबंध या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.

Wednesday, November 11, 2020

लांजा व्हिलेज...हिमालयातील हे एक अफलातून ठिकाण....


 लांजा व्हिलेज...हिमालयातील हे एक अफलातून ठिकाण.... 

हे ठिकाणचे वैशिष्ट्यचं मुळात रात्रीची फोटोग्राफी हे असतं...चारही बाजूने पर्वत आणि मध्येच छोट्याशा जागेत वसलेलं हे काही वीस बावीस घरांच गावं...वाहनांची रेलचेल नसल्याने आणि अतिशय उंचावर असल्याने येथे प्रकाशाचं प्रदूषण अगदीच नगण्य असतं...या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात असलेला एका उंच जागेवर स्थापित केलेला भगवान गौतम बुध्दांचा नितांत सुंदर असा पुतळा..

वाचा सविस्तर  on इये मराठीचिये नगरी 

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

किंवा

  Search Iye Marathichiye Nagari app on Google Play  and Download



Tuesday, November 10, 2020

तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ).

 



तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी.

-    राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

वाचा सविस्तर  on इये मराठीचिये नगरी. अॅप

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

किंवा गुगुल प्ले स्टोअरवर शोधा इये मराठीचिये नगरी अॅप

Monday, November 9, 2020

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 


तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

हे जीवन जगताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण असलो काय अन् नसलो काय हे जग पुढे चालतच राहणार. ही ओळख करून घेऊन आपण स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळखून ते कार्य करायला हवे. म्हणजेच स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. या देहावर विजय संपादन करायला हवा. मगच आपण या विश्वावर विजय संपादन करू. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। 471 ।। अध्याय 11

ओवीचा अर्थ – आणि यांत केवळ रिकामें यशच मिळणार आहे असें नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यांत आलेले आहे. अर्जुना, तूं केवळ नावांला मात्र कारण हो.

आपण फक्त निमित्तमात्र आहोत. ही अनुभुती येणे अध्यात्मिक प्रगतीसाठी खूप गरजेचे असते. एकदा एक राजा जंगलात भटकत असताना त्याला एक सत्पुरुष भेटला. त्याच्या भेटीत त्याचे जीवनच बदलले. राजाने खूप मोठा पराक्रम केला होता. नुकताच त्याचा राज्याभिषेकही झाला होता. राजाने उभा केलेल्या त्या स्वराज्याचा त्याला अभिमानही होता. तसे असणे स्वाभाविकही होते. राजा जेव्हा या साधूपुरुषास भेटला तेव्हा त्या साधू पुरुषाने त्याला फक्त एकच विचारले. तु काय काय जिंकलास ?  राजा गर्वाने म्हणाला. मी अनेक किल्ले जिंकले आहेत. अनेक साम्राज्य माझ्या प्रभावाखाली आहेत. जवळपास आता जिंकायचे काही उरलेच नाही. ही सर्व भूमी ही माझीच झाली आहे. तेव्हा तो साधू पुरुष शांत स्वभावाने त्याला म्हणाला. ठिक आहे. तुझा देह म्हणजे ही सुध्दा एक भूमीच आहे. मग तु ती जिंकला आहेस का ?  राजा थोडा कोड्यात पडला. या साधूंना मी सांगतो आहे. तुम्ही उभी आहात ती भूमी सुध्दा माझी आहे. मग या देहाचे हे काय विचारात आहेत. सगळच जिंकले आहे मग देह कसा काय जिंकला नाही असे का या सत्पुरुषास वाटते. त्याला काहीच समजले नाही. यावर राजा म्हणाला. हे सत्पुरुषा आपण काय बोलत आहात ते माझ्या काहीच लक्षात येत नाही. तरी मला तुम्ही समजावून सांगू शकाल का सत्पुरुष म्हणाला हो जरूर. तु सगळं जग जिकला आहेस. पण स्वतःला तु जिंकला नाहीस. मी स्वतःवर विजय मिळवला आहे. स्वतःवर जेव्हा तू विजय मिळवशील तेव्हा तू सर्व जगावर विजय मिळवला आहेस असो होईल. स्वतःच्या देहातील आत्मा मी जिंकला आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या आत्म्याला तु जिंकू शकला नाहीस. हे जिंकणे तुझे बाकी राहीले आहे. तु स्वतःला जेव्हा जिंकशिल तेव्हा तू खरा आत्मज्ञानी होशील. भूत, भविष्य, वतर्मानावर तुझे राज्य असेल. पण तु अद्याप त्या देहामध्ये अडकला आहेस. देहावर तु विजय मिळवलेला नाहीस. देह आणि आत्मा वेगळा आहे याचे ज्ञानही तुला नाही. राजाला आता देहावर विजय मिळवण्याची इच्छा झाली. त्याने म्हटले जग जिंकले आहे, मग हा देह काय आहे. त्याच्यावरही विजय मिळवू. यावर तो सत्पुरुष म्हणाला, हे राजन तु म्हणतोस तितके सोपे हे नाही. कारण तु मुळात काही जिंकलेच नाही. मी केले मी केले याचा तुला हा अंहकार आहे ना हा प्रथम तुझ्यातून जायला हवा. कारण तु फक्त निमित्र मात्र आहेस. जग जिंकण्यास तु फक्त एक कारण आहेस. स्वराज्य सुराज्य व्हावे यासाठी हे कार्य तुझ्याकडून करवून घेतले आहे. तु यात फक्त निमित्त मात्र आहेस. यावर राजा अधिकच बुचकळ्यात पडला. म्हणाला हे आता नवीन काय सर्व जगाला माहीत आहे. मी या साम्राज्याचा राजा आहे. मीच निर्माण केले आहे हे राज्य. आमच्या पिढ्यान पिढ्या या भूमिवर राज्य करत आल्या आहेत. आणि तु मला मी काहीच केले नाही असे कसे म्हणतोस. मी अन् निमित्तमात्र छे..हे मला पटणारे नाही..यावर तो सत्पुरुष म्हणाला, तु राज्य उभे करण्यासाठी तुला कोणी प्रेरीत केले. तुला कोणी हे कार्य करण्यास सांगितले. तु केले नसतास तरी हे राज्य उभे राहीले नसते असे तुला वाटते काय याचा विचार कर. राजा मेला म्हणून राज्य चालायचे राहात नाही. आज तु राजा झाला आहेस उद्या आणखी कोणी होईल. कोण मेले म्हणून राज्य उभे राहात नाही असे नाही. तुला तुझ्या मानस मातेने हे राज्य उभे करण्यासाठी प्रेरित केले आहे. म्हणजे त्या मातेने हे राज्य उभे केले आहे. त्या मातेचे हे राज्य आहे. तु फक्त तिच्यासाठी निमित्त मात्र झाला आहेस. या मातेने लोक गोळा केले. तुझ्यामागे उभे केले. तुला घडविले. मग तुला असंख्य लोकांनी हे राज्य उभे करण्यात मदत केली. काहींनी तुझ्यासाठी रक्तही सांडले. काहींनी जीवही गमावला. मग हे राज्य तु उभे केले असे कसे म्हणतोस. तु काय केलेस मला सांग. या सर्वात तु निमित्त मात्र आहेस. राज्याला ही गोष्ट पटली. पण देहावर विजय मिळवायचा कसा याचे काही कोडे उलघडले नाही. अखेर राजाने या राज्याचा त्याग करण्याचे ठरवले व सन्यास आश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. राजाने निर्णय घेतला. मी सन्यास आश्रम स्वीकारेन पण जो पर्यंत माझा वारस आत्मज्ञानी होत नाही तोपर्यंत माझा मुख्य वारस हा सन्यास आश्रम स्वीकारेल बाकीचे वारसे राजगादी सांभाळू शकतील. बाकीच्या वारसे सन्यास आश्रमात असतील त्यांना मानाने गादीचा मान देण्यात यावा. भिक मागून कोणी राजा होत नाही. मानाने त्यांना गादी देण्यात आली तरच त्यांनी ती स्वीकारावी. असे काही नियम राजाने केले. पण राजाला एक चिंता सतावू लागलो. तो म्हणाला राज्य सोडल्यानंतर माझ्या वारशांना आपण राजाचे वंशज आहोत याचा विसर पडला तर ते कधीच राजे होणार नाहीत. तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, मेंढ्यांच्या कळपात सिंह जन्माला आला तर तो मेंढ्यासारखे वागतो का सिंहाला पाण्यात पाहील्यानंतर आपण मेंढ्यापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव निश्चितच होते. त्याची डरकाळी ही आपोआप फुटते. तसे राजा सन्यस्थ असला तरी त्याचा राजधर्म त्याच्या सोबत असतो. त्यातून तो स्वतःची ओळख स्वतः करून घेतो. हेच अध्यात्म आहे. स्वःची ओळख करुन घेणे हेच तर अध्यात्म आहे. राजाला त्याची ओळख स्वतःच होते. त्याला आपण राजे आहोत असे सांगावेही लागत नाही. म्हणूनच म्हटले हे जीवन जगताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण असलो काय अन् नसलो काय हे जग पुढे चालतच राहणार. ही ओळख करून घेऊन आपण स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळखून ते कार्य करायला हवे. म्हणजेच स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. या देहावर विजय संपादन करायला हवा. मगच आपण या विश्वावर विजय संपादन करू. प्रत्येकाने या विश्वावर विजय संपादन केला आहे. फक्त निमित्त मात्र होऊन त्याची ओळख करून घ्यायची आहे. मग जो वारस हे जिंकेल त्याला हे राज्यच काय सर्व विश्वच त्याचे होईल. यासाठीच केवळ निमित्त मात्र व्हायचे आहे. आणि अध्यात्मिक प्रगती साधायची आहे. स्वःची ओळख जेव्हा होईल तेव्हा आत्मज्ञानाने तो निश्चित म्हणेल आणि ओळखेलही हे राज्य माझ्या पुर्वजाने एका मातेच्या इच्छेसाठी, तिच्या मार्गदर्शनाने उभे केले होते. मी फक्त निमित्त मात्र होतो. कर्ता करविता ती माता होती. मातेच्या रुपात स्वयं भगवान कृष्ण होते.   

 

 

  

  

Friday, November 6, 2020

कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान

 


राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस 7 नोव्हेंबर 


कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान 

कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो.
लेेेखन - प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे 
सहाय्यक प्राध्यापक
सांगोला महाविद्यालय, जि. सोलापूर
मोबाईल नंबर 9822119330
.................................

जागतिक वार्षिक मृत्यूदरामध्ये हृदयरोगानंतर दुसरा क्रमांक हा कर्करोगाचा आहे. मानवी शरीर हे सुमारे दशलक्षाहून अधिक प्रकारच्या विविध पेशींपासून बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना पेशींचे विभाजन हे कठोर नियंत्रणात असते. मात्र या नियंत्रण व्यवस्थेमध्ये काही कारणांनी बिघाड झाल्यास पेशींची अनियंत्रित विभाजन होऊन वाढ होते या अवस्थेस कर्करोग असे म्हणतात. कर्करोग हा एक जटिल आजार आहे. कर्करोग (कॅन्सर) हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ खेकड्याच्या चाव्याप्रमाणे वेदना होण्याच्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे.पुरातन काळापासून कर्करोगाने मानवांवर परिणाम केला आहे परंतु गेल्या शतकात मृत्यूच्या उच्च दराचे हे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. कर्करोगाचा परिणाम व्यक्तींच्या कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, परंतु वृद्धापकाळातील लोकांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. एपिडेमियोलॉजिकल आणि एटिओलॉजिकल अभ्यासानुसार स्पष्टपणे निदर्शनास आले आहे की वय वाढल्यामुळे कर्करोगाच्या घटनांचा धोका वाढतो.

कर्करोग निर्माण होण्याच्या प्रक्रियेस कार्सिनोजेनेसिस असे संबोधितात. कॅन्सर होण्यास कारणीभूत घटकांना कार्सिनोजेन संबोधितात. विसाव्या शतकात सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली. यामुळे वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे आणि शेवटी कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

कर्करोगावर विजय मिळविण्याच्या मुख्य ध्येयासाठी अद्याप मानवी समाज संघर्ष करीत आहे. सामान्य पेशी या कर्करोगाच्या ऊतकात रूपांतरित होतअसतात. कर्करोगाच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या केमोथेरपी औषधे ही वेगाने विभाजन होणाऱ्या पेशीविरूद्ध सक्रिय असतात. ही औषधे कर्करोगाच्या पेशी तसेच सामान्य पेशी, विशेषत: केसांच्या फोलिकल्स, हाडांमधील रक्त पेशी आणि शरीरातील वेगाने विभाजित होणाऱ्या पचनसंस्थेच्या पेशी नष्ट करतात. गंभीर आणि विषारी दुष्परिणामांमुळे उपचारांची प्रभावीता गंभीरपणे मर्यादित राहते कारण रासायनिक औषधे कर्करोग आणि सामान्य पेशींमध्ये भेद करण्यास अक्षम आहेत. 

कर्करोगाचे पाच प्रकार


1) कार्सिनोमा: शरीराच्या अवयवांच्या बाहेरील स्तरांमध्ये कार्सिनोमाची सुरूवात होते. हा एखाद्या अवयवामध्ये किंवा ग्रंथीमध्ये विकसित होतो किंवा स्त्राव, फुफ्फुस, गर्भाशय, आतडे आणि मूत्रमार्ग यासारख्या स्राव करण्यास सक्षम असलेल्या अवयवांच्या बाह्यआवरणामध्ये उद्भवतो 

2) सॅक्रोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू आणि नसा सारख्या हाडांच्या मज्जाच्या बाहेरील सहाय्यक आणि संयोजी ऊतकां मध्ये व पेशींमध्ये उद्भवतो. सामान्यत: सॅक्रोमा मोठ्या प्रमाणात वेदनादायी असणारा कर्करोग आहे. 

3) लिम्फोमा: हे रक्त पेशींचे ट्यूमर असतात जे लिम्फॅटिक नोड्‌स आणि इम्यून सिस्टमच्या ऊतकांमध्ये उद्भवतात. 

4) ल्युकेमिया: हा कर्करोग हाडांच्या पोकळीतील रक्तपेशींमध्ये सुरू होतो आणि रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या श्वेत रक्त पेशींच्या असामान्य वसाहतींचे अत्यधिक उत्पादन करतो.. 

5) अडेनोमा: या प्रकारात ग्रंथीच्या पेशींमध्ये तयार होणारे ट्यूमर जसे स्तन, पिट्यूटरी, थायरॉईड, यकृत,अधिवृक्क, लाळ उत्पादक ग्रंथी इ. समावेश होतो 

कर्करोगाची कारणे 


अ) अनुवांशिक घटक 

1) प्रोटो-ऑन्कोजेन्सः प्रोटो-ऑन्कोजेन्समधील उत्परिवर्तन ऑन्कोजेन तयार करतात ज्यामुळे कर्करोग होतो. 

2) ट्यूमर सप्रेसर जीन्स: हे जीन्स पेशींचे विभाजन थांबवण्यासाठी आदेश देतात आणि पेशींच्या मृत्यूचे नियमन करतात. ट्यूमर सप्रेसर जीन्समधील परिवर्तनांमुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि कर्करोग होतो. उदा. पी-57, रास. 

3) सुसाइड जीन्स: या जीन्समध्ये उत्परिवर्तन झाल्यास पेशींचा नाश होतो आणि जर यामध्ये बदल झाले तर पेशी मरत नाहीत परंतु वेगाने विभाजित होतात व कर्करोग होतो. 

4) डीएनए-दुरुस्ती जीन्स: हे पेशींमध्ये खराब झालेले डीएनए दुरुस्त करतात. जर ही जनुके उत्परिवर्तित झाल्यास, ते कर्करोगास कारणीभूत असणा-या डीएनए नुकसानीस दुरुस्त करण्यात अक्षम ठरतात व कर्करोगाची सुरुवात होते. 

ब) कार्सिनोजेन्सः कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो. 

कार्सिनोजेन प्रकारावर आधारित, कार्सिनोजेनेसिसची प्रक्रिया विविध विभागांमध्ये विभागली गेली आहे. ते विभाग असे - 

1. रासायनिक कार्सिनोजेनेसिसः 

यामध्ये सेंद्रिय संयुगे, खनिजे, फूड कार्सिनोजेन, तंबाखू (निकोटिन), तंबाखूचा धूम्रपान, एस्बेस्टोस, ऑटोमोबाइल्सच्या एक्‍झॉस्ट धूर, डिझेल एक्‍झॉस्ट पार्टिक्‍युलेट्‌स, आर्सेनिक, निकेल इत्यादींचा समावेश आहे. सामान्यत: ज्ञात कार्सिनोजेनमध्ये एस्बेस्टोस, आर्सेनिक, बेंझिन, 

प्लास्टिक मधील बिस्फेनॉल ए (बीपीए), कीटकनाशके, डायऑक्‍सिन, अतिनील किरणे, पॉलीब्रॉमिनेटेड डायफेनिल एथर्स (पीबीडीई), तंबाखूचा धूर आणि पॉलिसायक्‍लिक, अरोमेटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच), अस्थिर सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) यांचा समावेश आहे. बेंझोपायरिन या तंबाखूच्या धुम्रपानात असणाऱ्या पॉलिसायक्‍लिक सुगंधी हायड्रोकार्बनमुळे रासायनिक कार्सिनोजेनेसिस प्रक्रियेतून मुखाचा कर्करोग होऊ शकतो. 

2. आयनीकरण किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या तुलनेत आयनीकरण किरणें अत्यंत ऊर्जावान असतात. एक्‍स-रे, गॅमा किरण आणि इतर आयनीकरण किरणांमुळे डीएनएमध्ये अनुवांशिक बदल होतात. रेडिएशन प्रेरित कार्सिनोजेनेसिस दरम्यान, पाण्याच्या रेणूंनी उर्जा नष्ट होण्यामुळे पाण्याचे आयनीकरण होते आणि विरघळलेल्या इलेक्‍ट्रॉनसह मुक्त रॅडिकल्स तयार होतात. या मुक्त रॅडिकल्समुळे डीएनएच्या रचनेत बदल होतात 

3. अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

मानवी त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे अतिनील किरणोत्सर्गाचा संसर्ग. बेसल सेल कार्सिनोमा (बीसीसी) आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (एससीसी) हे पूर्वी निदान झाल्यास त्यांचे उपचार केले जाऊन बरे होऊ शकतात. शरीरभर पसरण्याची त्यांची क्षमता खूपच कमी आहे. क्‍यूटानियस मॅलिग्नंट मेलानोमा (सीएमएम) त्वचेचा प्राणघातक कर्करोग आहे.त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित मृत्यूमध्ये 75 टक्के मृत्यू यामुळे होतात. 

4) बायोलॉजिकल कार्सिनोजेनः यामध्ये निकोटिन, स्ट्रेप्टोमायसिस सारखे वनस्पती, प्राणी व किटकांमधील दूषित घटक आहेत कीटकांचे क्विनोन आणि ट्रामाटोड्‌स सारख्या परजीवी विषारी पदार्थांचाही यामध्ये समावेश होतो. 

5) ऑन्कोजेनिक विषाणू: या विषाणूंमुळे यजमान पेशींमध्ये कर्करोग होण्याची शक्‍यता असते अशा स्वरुपाचा आणि जीवरासायनिक बदल होऊ शकतो. उदा. लैंगिक अवयवांचा कर्करोग हा ह्यूमन पॅपिलोमा विषाणूमुळे होतो. 

6) वय: कर्करोगाचा धोका वाढत्या वया प्रमाणे वाढतो परंतु तो कोणत्याही वयात तो उद्भवू शकतो. 

7) जीवनशैली: जास्त मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. 

8) पोषणः लाल मांसाशी संबंधित आहार, उच्च कॅलरी आणि भाज्या व फळांचा अभाव यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आहारातील खराब सवयींमुळे लठ्ठपणात वाढ होऊन स्तन, गर्भाशय आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढते 

9) रोगप्रतिकारक यंत्रणा: दुर्बल रोगप्रतिकारक यंत्रणाअसलेल्या लोकांना लिम्फोमासारखे कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते. 

कर्करोगाचा प्रतिबंध 


कर्करोगाचा उपचार करण्यापेक्षा त्याला होण्यापासून प्रतिबंध करणे हे उत्तम आहे. हा एक जटिल प्रकाराचा आजार आहे. याला आंतरिक घटक जनुके, जीवनशैली, वय आणि बाह्यपर्यावरणीय घटक जबाबदार असतात. त्यापैकी एक किंवा बरेच घटक कर्करोग होण्याचा धोका निर्धारित करतात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी म्हणून घेतलेल्या उपायांना कर्करोग प्रतिबंध म्हणतात. यामध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, जास्त प्रमाणात धूम्रपान व मद्यपान न करणे, निरोगी वजन राखण्यासाठी शारीरिक हालचाली व योग्य व्यायाम करणे, नियमित लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. 

(लेखक हे कॅन्सर संशोधक आहेत.) 

विश्वरुपाकडे असे पाहावे...( एकतरी ओवी अनुभवावी)

 

विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तरि मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । 

सैंध पसरिलीं आणि तोंडे । आतां ग्रासीन हें आघवें ।। 451 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - तर अरें, मी काळ आहें हें पक्के समज, मी जगाचा नाश करण्याकरितां मोठा होत आहे. माझी तोंडे चहुकडे पसरलेली आहेत व मी ( त्या तोंडांनी ) हे सर्व आतां गिळून टाकीन. 

दुष्टांच्या सहाराकरिता भगवंताचा अवतार होतो. मग हा भगवंत कोणाच्याही रुपात प्रकट होऊ शकतो. कारण तो सर्वांमध्ये आहे. विश्वरुप हे काही भिती दाखवण्यासाठी नाही. तर आपणाला जागे करण्यासाठी आहे. हे जाणून घ्यायला हवे. विश्वरुपाने दहशत निर्माण होत नाही तर जागृती येते. माणसाला त्याचे खरे स्वरुप समजावून सांगण्यासाठी विश्वरुप दर्शन आहे. सध्याच्या काळात म्हणाल, तर निसर्गाचा प्रकोप असेल किंवा एखादा महामारीसारखा आजार असेल. हे पूर्वीच्या काळीही होते. पण ही संकटे माणसाला भानावर आणण्यासाठी आहेत. माणसा माणसातील वाढत चाललेला दुरावा दूर करण्यासाठीही आहेत. माणसात माणूसकी निर्माण करण्यासाठी आहेत. यादृष्टिने त्याकडे पाहायला हवे. आपण या संकटाकडे कसे पाहातो यावरही सर्व काही अवलंबून आहे. संकटाकडे सकारात्मकदृष्टिने पाहिल्यास त्यातील समस्या सहज सुटु शकतात. नकारात्मक दृष्टिने पाहिले तर समस्या वाढतच राहतात. आलेली संकटे झेलायला शिकले पाहिजे. हसत हसत त्यांना सामोरे जायला हवे. मनाला विचलित न होऊ देता त्यांचा सामना करायला हवा. विश्वरुपदर्शनाकडेही जसे आपण पाहातो तसेच या समस्यांकडे पाहायला हवे. विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल. सुख होऊ दे किंवा दुःख होऊ दे. दोन्ही गोष्टीने मन विचलित होता कामा नये. मनाची स्थिरता दोन्ही गोष्टीमध्ये सारखीच ठेवायला हवी. मनाचा समतोल साधता आल्यास आपली प्रगती होईल. अध्यात्मिक विकासात या गोष्टींना महत्त्व आहे. आपण काही करत नाही. हे माझ्यामुळे झाला हा आपला अहंकार आहे. मी याला मारले. त्याला मारले. या सर्व अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्यातील अहंकार जायला हवा. म्हणजेच आपल्यातील मी पणा जायला हवा. हा अहंकार, मीपणा, क्रोध गिळायला आपण शिकले पाहीजे. तो पचवायला आपण शिकले पाहीजे. हे आपण जर करू शकलो. आपण हा आपल्यात बदल घडवू शकलो, तर आपण निश्चितच प्रगती करू शकू. आत्मज्ञान प्राप्तीसाठी याची गरज आहे. 


Monday, November 2, 2020

विश्वरुपातील उग्ररुप (एक तरी ओवी अनुभवावी)

 



चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल ८९९९७३२६८५

किती  वाढविसी या उग्ररुपा । अंगीचे भगवंतपण आठवीं बापा ।

नाहीं तरि कृपा । मजपुरती पाहीं ।। 443 ।। अध्याय 11 वा


ओवीचा अर्थ - या उग्ररुपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण ( पालन करण्याचा स्वभाव ) आठव. नाहीतर तसें करण्याचें आपल्या मनांत नसेल तर माझ्यापुरती तरी कृपा कर.


आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग उभे राहात असतात. या प्रसंगांना घाबरून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जायचे असते. या प्रसंगांनी भितीने थरकाप उडतो. निसर्गाचे उग्ररूप तर नेहमीच आपणाला अनेक आव्हाने उभे करते. पूर, भुकंप, साथीचे आजार, अपघात अशा आपत्तीने जीवन चिंताजनक होते. असे प्रसंग नैसर्गिक असतात. ते कोणी घडवत नाही. निसर्गाचा हा प्रकोप अंगावर शहारे आणतो. निसर्गाच्या या प्रकोपापुढे कोणाचेही चालत नाही. पाण्याची शक्ती, वीजेची शक्ती, वाऱ्याची शक्ती, पृथ्वीच्या पोटातील ज्वालामुखीची शक्ती अशा या शक्तीचे उग्ररुप आपणास देवाची आठवण करून देते. म्हणजे या शक्तीचा कर्ता करविता कोणी आहे असे समजून त्याला आपण शरण जातो. खरचं देव आहे की नाही माहीत नाही. पण ही शक्ती आहे. त्या शक्तीची ओळख आपणास या उग्ररुपातून होतो. त्याची अनुभुती येते. पण आपल्यामध्येही एक शक्ती आहे तिची ओळख आपण करुन घेत नाही. त्या शक्तीची ओळख व्हावी यासाठी ही अनुभुती आहे. असे मानायला काहीच हरकत नाही. भितीने आपण त्या शक्तीला शरण जातो. पण प्रत्यक्षात या सर्वाचे प्रयोजन आपल्यातील अंहकार, गर्व, मोह, माया घालवण्यासाठी आहे. ही अनुभुती आपणास आपल्याला स्वः ची ओळख करून देण्यासाठी आहे. ही शक्ती तुझ्यातही आहे असे भगवंतांचे सांगणे आहे. त्याची जाणीव करून घेण्यासाठी या विश्वरुपाचे दर्शन आहे. देवात जो आत्मा आहे, तोच समस्त मानवात आहे. देव म्हणजे समस्त मानवात असणारा आत्मा आहे. सर्वांमध्ये तो आहे. तो वेगवेगळ्या रुपात आहे. वेगवेगळ्या शक्तीच्या रुपात तो आहे.  या शक्तीचा वापर चांगल्यासाठीही होतो आणि वाईटासाठीही होतो. फक्त आपण तो वापर कशा पद्धतीने करायचा यावर ते अवलंबून आहे. वाऱ्याच्या वेगाने नुकसान होते. पण त्याच वाऱ्यापासून पवनचक्की चालते. वीज निर्मिती करता येते. पाण्याची शक्तीही तशीच आहे. त्यापासूनही वीजेची निर्मिती होते. ही शक्ती एकातून दुसऱ्या प्रकारामध्ये परावर्तीत होते. तसे आपणही आपल्यात असणारी ही शक्ती चांगल्या गोष्टीच्या निर्मितीमध्ये परावर्तीत करायला हवी. जैवविविधतेमध्ये प्रत्येक वनस्पतीचे महत्त्व आहे. मग ती विषारी असो वा बिनविषारी. मृतावस्तूवर जगणारी असो वा जमिनीवर वाढणारी असो. परोपजिवी असो वा स्वयंउर्जीत असो. प्रत्येकाचा काहीना काही फायदा आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक वस्तूत औषधी गुणधर्म आहेत असे म्हटले आहे.  हे जसे आहे तसेच आपल्यातही चांगले गुणधर्म आहेत. म्हणजेच आपण आपल्यातील सात्विक भाव जागृत करायला हवेत. आपल्यात असणारी ही शक्ती आपण सात्विक भावात परावर्तीत करू शकतो. सात्विक विचारातून, आचारातून आपल्यातील अध्यात्मिक विकासास चालना मिळेल. आत्मज्ञानाची प्रचिती येते. भगवंताचे उग्ररुप आपण आध्यात्मिक विकासात परावर्तीत करू शकलो तर आपणास निश्चितच आत्मज्ञानाचा लाभ होईल. याचा अर्थ आपल्या आसपास घडणाऱ्या वाईट घटनातून आपण विचलित न होता. त्यांना चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी. आपल्यातील भगवंतपण आपण सदैव जागृत ठेवायला हवे. माणसाला भगवंतरुपाची, चांगल्याची प्रचिती आणण्यासाठी विश्वरुपातील उग्ररुपाचे दर्शन आहे. आपल्यातील भगवंत जागा करण्यासाठीच हे सर्व आहे. हे जाणून घेऊन आपण आपली अध्यात्मिक प्रगती साधायला हवी.


द सेकंड सेक्स



द सेकंड सेक्स

लेखिका : सिमोन द बोव्हुआर

अनूवाद : करुणा गोखले 


सिमोन द बोव्हुआरचे *द सेकंड सेक्स* हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते. स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांनी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही, तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो. याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्थिमित होतो. सिमोनची निरीक्षण शक्ति आणि सैद्धांतिकरन यांची ताकद एवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते. जगभर गाजलेला हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 

द सेकंड सेक्स

लेखक : सिमोन द बोव्हुआर

अनुवाद : करुणा गोखले

 मूळकिंमत : 600 रु 

टपालखर्चासह किंमत : 540 रु 

घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क *सहित वितरण* 9960374739 / 9096399397

Whatsapp link : https://wa.me/919960374739

स्क्रीन टाईम


स्क्रीन टाईम

लेखक : मुक्ता चैतन्य

'हे बघू नकोस, ते बघू नकोस,' असं सतत मुलांना सांगून मुलं कुठली ऐकायला ? त्यापेक्षा इंटरनेटच्या जादुई दुनियेची सफर सुरक्षितपणे कशी करायची, हे आई-बाबांनीच त्यांना शिकवलं तर? 

काय बघायचं नाही' याची नकारघंटा वाजवत राहण्यापेक्षा 'काय बघायंच ?' हे मुलांच्या बरोबर आपणही शोधलं तर? समजून घेतलं तर? 

काॅम्प्युटरच्या पडद्यावरच्या हलत्या 'खिडक्या' बंद केल्या, तर मुलं हट्टानं त्या उघडणारच,  आपण त्यांना दारचं उघडून देऊ शकतो. . .  कशी?  तेच उलगडून सांगणारं पुस्तक ! 

सायबर स्पेसचे किचकट प्रश्न सोडवण्याचे सोपे मार्ग अगदी साध्या सोप्या भाषेत आणि वेगवेगळ्या मार्गदर्शक 'खिडक्यां'ची माहिती मुलांपर्यत व पालकांपर्यत पोहोचवणारे मार्गदर्शक . 

संपूर्ण कुटुंबाला सजगपणे आभासी जगाची भटकंती करायला प्रव्ृत्त करणारं पुस्तक !

स्क्रीन टाईम

लेखक : मुक्ता चैतन्य

मूळ किंमत : 200/- रु

सवलत व टपालखर्चासह किंमत : 170/- रु


घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क *सहित वितरण* 9960374739 / 9096399397

whatsapp link : https://wa.me/919960374739

Saturday, October 31, 2020

इस्त्रायलची मोसाद



इस्त्रायलची मोसाद

लेखक : पंकज कालुवाला

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे मोसाद चे खरे स्वरुप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरुन उरणार्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्रे, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मात्ृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.

वाढीव मजकूर व विशेषत्वाने तयार केलेल्या नकाशांसह .

इस्त्रायलची मोसाद

लेखक : पंकज कालुवाला

किंमत : 700रु

सवलतीत : 630 रु

घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क सहित वितरण 9960374739 / 9096399397


Wednesday, October 28, 2020

विश्वरुपाचे मर्म (एक तरी ओवी अनुभवावी)

अहंकार गेल्याशिवाय या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत नाही. मनातील अहंकार, भिती नष्ट करण्यासाठी हे विश्वरुप दर्शन आहे. देवाचे विश्वरुप दर्शन हे भक्ताला घाबरवण्यासाठी नाही तर त्याला जागे करण्यासाठी आहे. हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


अरे कोन्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारी ।

हे विश्वरुपव्याजें हरी । प्रकटित असे ।। 408 ।। अध्याय 11 वा


ओवीचा अर्थ - अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही, यांच मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्त्व विश्वरुपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे.


हे मी केले, हे माझ्यामुळे झाले. याचा गर्व प्रत्येकाला असतो. राजकर्त्यांनातर याची लागणच झालेली असते. त्यांना तर सर्व जग आपणच चालवतो आहोत असे वाटत असते. त्यांना तर त्यांचे भवितत्व त्याच्यावरच अवलंबून आहे असे वाटत असते. पण हे राजकर्त्ये तितकेच भित्रे ही असतात. याचे उत्तम उदाहरण सांगायचे तर कंसांचे सांगता येईल. देवकीचा पुत्र कंसाला मारणार असे भविष्य कंसाला कोणीतरी सांगितले. तेव्हा कंसाने देवकीचे सर्व पुत्र मारले. देवकीला त्याने तुरुगातही ठेवले. इतका भित्रा तो होता. त्याने दहशत माजवली. ही दहशत भितीपोटी होती. माणसाला स्वतःचा जीव सर्वात प्रिय असतो. पण त्यासाठी त्याने किती निष्पाप जीवांना मारले. शेवटी विधिलिखीत होते तेच घडले. ते त्याला टाळता आले नाही. जे घडणारे आहे ते कोणी टाळू शकत नाही. नशिबातील गोष्ट कोणी बदलू शकत नाही. जन्म घेणारा जन्म घेतोच. तुम्ही त्याला एकदा माराल. दोनदा माराल. देवकीचे सात पूत्र मारले. पण आठव्याने कंसाला मारले. सध्याच्या युगात स्त्री भ्रुण हत्या हा प्रकार वाढला आहे. गर्भाशय तपासून स्त्री गर्भाची हत्या केली जाते. कंसाचा हा नवा अवतारच म्हणावा लागेल. पण कंसाचे काय झाले याचाही विचार करायला हवा. अहंकारच या सर्वामागे आहे. अहंकारच आपणास संपवतो हे लक्षात घ्यायला हवे. हा अहंकार घालवण्यासाठी दैवी शक्ती जन्म घेते. प्रत्येकातील अहंकार घालवण्यासाठी अशा घटना घडत असतात. राजाला सु्द्धा स्वतः राज्य घडवल्याचा अहंकार असतो. तो घालवण्यासाठी हे सर्व विश्वरुप दर्शन आहे. अहंकार गेल्याशिवाय या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत नाही. मनातील अहंकार, भिती नष्ट करण्यासाठी हे विश्वरुप दर्शन आहे. देवाचे विश्वरुप दर्शन हे भक्ताला घाबरवण्यासाठी नाही तर त्याला जागे करण्यासाठी आहे. हे विचारात घ्यायला हवे. याचा अभ्यास करून यातील मर्म समजून घ्यायला हवे. हे मर्म समजले तरच खरा अध्यात्मिक विकास होईल. वाल्ह्याचा वाल्मिकी झाला, तसा या नराचा नारायण होईल. जितकी मोठी व्यक्ती तितका मोठा अहंकार असतो. तो घालवण्यासाठी तितके मोठे विश्वरुप भगवंताला घ्यावे लागते. विश्वरुप दर्शनामागचे प्रयोजन समजून घ्यायला हवे. तरच अध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. मी, मी, मी..हा मी कोण ? स्वरुपाची ओळख झाल्याशिवाय हा मीपणा जाणार नाही. यासाठी स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवे. मी कोण आहे ? या स्वरुपाचे ध्यान करायला हवे. स्वरुपात मन रमवायला हवे. तरच या विश्वरुपाचे मर्म कळेल. विश्वरुपाचे खरे दर्शन होईल. मगच भक्तीची द्वारे उघडतील. 


Sunday, October 25, 2020

उदक्कार ( प्रतिमा इंगोले )

  


उदक्कार

माये तुझं रूप 

निर्गुण निराकार 

सगळ्या सृष्टीत 

सामावलेलं....


प्रत्येकाला

घेण्या कुशीत 

सारखं समोर 

आलेलं....


पण तेवढ्यानं

आता भागत नाही..

तेव्हा माये 

हो ना...

सगुण साकार!


मनामनात 

फुलू दे...

झंकार...

ओठाओठात 

उमटू दे...

उदक्कार...

उदक्कार!


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९

Saturday, October 24, 2020

वडणगेतील महिला म्हणतात, इंग्रजी नव्हे जर्मनही येते..!.

 


वडणगेतील महिला म्हणतात,  इंग्रजी नव्हे जर्मनही येते..!. 

मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषांवरही तेवढेच प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांनीही यात मागे असता कामा नये, या उद्देशाने डॉ. अपर्णा पाटील यांनी जागृती केली.

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, October 23, 2020

देव म्हणजे काय ? ( एकतरी ओवी अनुभवावी ).

 


देव म्हणजे काय ? ( एकतरी ओवी अनुभवावी )

अध्यात्मात चमत्काराला थारा नाही. कारण अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. चमत्कार हे विज्ञानातून घडत असतात. विज्ञान आणि अध्यात्म यात फरक आहे. मला साक्षात्कार झाला म्हणजे काय झाले ? मला त्याची अनुभुती आली म्हणजे काय झाले ?... वाचा सविस्तर

on इये मराठीचिये नगरी.

Search iye Marathichiye nagari app on Google Play Store

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Thursday, October 22, 2020

गोंधळ ( प्रतिमा इंगोले)

 




गोंधळ 


माये!तुझं रूप मनामनात 

आरती घुमायची कानात 


एकदा नागवेलीच्या 

हिरव्या तांड्यात..

मन दचकलं

तूच दिसू लागली 

पानापानात...


तान्डभर सळसळ

हवेची झुळूक...

मनावर शहारा 

भीतीची चुणूक...


बया दार उघड 

बया दार उघड 


संतांची वाणी

दाटते उरात

कळ लागते  जीवघेणीे 


माये इथे तर 

सदाचीच फरफट

जिवाला काचणी

कोणापुढे घालावा

गोंधळ, तर

त्यांचीच मनमानी


शेवटी तुझाच

केवळ आधार 

निदान मन मोकळं 

करण्याचा पार..

बुडत्याला काडीचा आधार!


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.

Wednesday, October 21, 2020

झाकलप ( प्रतिमा इंगोले )

 


झाकलप


माये आजकाल तशी 

झाकलपच फार...


अशावेळी संवाद 

होतो एक व्यवहार 

मन उलून येईल असं 

कोणी भेटतच नाही बघ 


तशी तू घेतेस कैवार

कधी मधी

निदान तसं वाटतं

अधी मधी...


तेही खूप पुण्याईचं 

तसं कोण मायेचं?

पण आजकाल 

आधार सुटल्यागत होतं 


मन उगाच 

थरथरू लागतं

आजचा दिवस निभला

पण उद्याचं काय?


अशावेळी तूच आठवू 

लागते महामाय!

भवताली परका माहोल 

मन होतं पाकोळी 

भिरभिरू लागतं 


सगळ्या वळचणी

ताब्यात घेतलेल्या 

अंगण तेही पारखं झालेलं...


प्रतिमा इंगोले.  ९८५०११७९६९

Monday, October 19, 2020

अलवार ( प्रतिमा इंगोले)

 


अलवार 

माये आजकाल 

असचं होतं बघ

मन सदा अलवार 

दाटून आलेल्या मेघागत..


कधीही झरतं आतल्या आत 

पापणीच्याही आत..

शिगोशिग पाणीच 

कधीही होतात ओले काठ...


कुणाशी सहज बोललं तरी

झरू लागतात 

डोळे अवचित 

मनही होत हळूवार...


चष्मा आहे हे बरं

नाही आजकाल

असं हळवं होणं

कुठं दिसतं साजरं...


आपण बोलावं 

मनाच्या गाभ्यातलं

तर समोरचा कोरडा ठक्क

सिंमेटच्या भिंतीगत

मन लिंपून बसलेला...


अशावेळी आपणच

हळवं मन झाकून 

होतो बेजार..

तसा तोही दुःख

झाकून, चेहरा 

पालटून तर आला नसावा...


म्हणूनच तुझ्या कुशीत 

फुटू लागतात मनाचे 

बांध,दुथडी वाहू

लागते पाणीच पाणी 

उगाचचं मन हेलावतं

आतल्या आत झरू लागतं...


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.



 

.

Sunday, October 11, 2020

एक अनोखा वार्ताफलक...

 


एक अनोखा वार्ताफलक...

काही वार्ता फलकावर  "सर्व सोयीचे घर भाड्याने देणे आहे" असाही मजकूर आता दिसू लागला आहे.  "टेंबलाबाईच्या जत्रेची वर्गणी भरा" असे आषाढ महिन्यात आवाहन केलेले वार्ताफलक आज अश्र्विन महिना आला तरी जसेच्या तसे आहेत.

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती यामध्ये सुधाकर काशीद यांच्या लेख..
 on इये मराठीचिये नगरी. 

Search iye Marathichiye nagari app on Google Play Store
 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, October 6, 2020

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता...(आंतरजालावरून साभार)

 


ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता

विज्ञान युगाचा अभिमान धरणाऱ्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल. अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.....

ज्ञानेश्वरीतील या ओव्या जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये
on इये मराठीचिये नगरी.

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, October 4, 2020

वरदान रागाचे...नातू आणि आजोबांच्यातील एक संवाद.


वरदान रागाचे...नातू आणि आजोबांच्यातील एक संवाद. 

आजवर गांधीजींवर लिहिलेली किती पुस्तकं आली त्याची गणती नाही. हा ओघ कितीही वाढला तरी त्यांच्याबद्दलचं आकर्षणही वाढतंच जातंय... या ओघात एक झुळूक माझीही, अनुवादक म्हणून !

.अरूण गांधी हे महात्मा गांधींचे नातू. त्यांचं ‘गिफ्ट ऑफ अँगर’ हे पुस्तक ‘वरदान रागाचे’ या शीर्षकानं आज ‘साधना प्रकाशना’कडून प्रकाशित होतंय... माझे संपादक विनोद शिरसाठ यांनी यासाठी खूप श्रम घेतले, ‘कर्तव्य साधना’ पोर्टलमधून या पुस्तकातील मजकूर दर आठवड्याला अतिशय नेमक्या फोटोंसहित प्रकाशित करण्याची त्यांची कल्पना चांगली होती. डॉ.अरूण गांधींनी ‘वारसा प्रेमाचा’ करण्यासाठी मला परवानगी दिलीच होती, पण आता हे दुसरंही पुस्तक अगदी हक्कानं माझ्याकडे सोपवलं. त्यांचे व बाकी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करणार्‍या तुषार गांधींचेही आभार! साधना प्रकाशन आणि लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी अडकूनही शिरसाठांसारख्या संपादकाच्या जोडीने सगळी कामं नेमकी नि वेळेत करणार्‍या सर्व सहकार्‍यांचे आभार!

नातू आणि आजोबांच्या संवादातला या पुस्तकातला एक तुकडा इथं शेअर करतेय...

- सोनाली नवांगुळ

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती मध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, October 2, 2020

देवा तूं अक्षर....

 


देवा तूं अक्षर....

कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी देहातील भगवंत राहीला देहातच उपाशी. यासाठी या देहातील भगवंत, देव जाणावा, तो जाणणे. त्याचा अनुभव घेणे. त्याची अनुभुती येणे हेच तर अध्यात्म आहे.
वाचा सविस्तर
on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari


Tuesday, September 29, 2020

अंड्याचे कवच, कचरा नव्हे, तर....

 


अंड्याचे कवच, कचरा नव्हे, तर.... 

भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. अमेरिकेत 1,50,000 टन, तर इंग्लंडमध्ये 1,10,000 टन इतका अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. या कवच्यांचे विघटन योग्य प्रकारे न झाल्यास यापासून दुर्गंधी उत्पन्न होते. तसेच आरोग्यासही अपायकारक ठरू शकते. यासाठी या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने काही संशोधकांनी याचे उपयोग शोधून काढले. काय आहे हे संशोधन वाचा सविस्तर....

https://www.esakal.com/premium-article/rajendra-ghorpade-writes-special-article-about-usage-raw-eggs-materials-352347

Thursday, September 24, 2020

तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन देशिंग हरोली येथे २५ सप्टेंबर रोजी...


देशिंग हरोली येथे २५ सप्टेंबर रोजी तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन.

तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन दिनांक २५ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे.देशिंग हरोली येथील अभिव्यक्ती प्रतिष्ठान मार्फत हे साहित्य संमेलन घेतले जाते .कै. सुर्यकांत पाटील यांचे स्मरणार्थ हे संमेलन घेतले जाते .या संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे....

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती मध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari