Saturday, November 28, 2020

वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी).

 


वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी). 

सर्व प्राणीमात्रात ही ऊर्जा आहे. त्यांच्या पोटात असणारा जठराग्निही त्याचेच रुप आहे. अन्न पचवण्याची ताकदही त्याच्यापासूनच मिळते आणि त्या अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा ही सुद्धा त्याचेच रूप आहे.... वाचा सविस्तर इये मराठीचिये नगरी ऍपवर

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

यासह अध्यात्मिक विचार, लेख वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

 Search iye Marathichiye Nagari App on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, November 17, 2020

कोकण किनारपट्टीवर जेली फिश (व्हिडिओ).

 


कोकण किनारपट्टीवर जेली फिश (व्हिडिओ). 

 See on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari App on Google Play Store and
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

ऊठ, जागा हो अन्... ( एकतरी ओवी अनुभवावी )

 


ऊठ, जागा हो अन्... ( एकतरी ओवी अनुभवावी ) 


शोक करत बसण्यात काहीच अर्थ नाही. यातून बाहेर पडायला हवे. आज इतक्या माळा साधना केली. उद्या तितक्या माळा साधना करायची आहे. असे करण्यापेक्षा दोन सेकंदाचे स्मरणही सर्व साधनेला मागे टाकते. दोन सेकंदाचे अवधान सर्वांवर उपयुक्त ठरते. यासाठी साधनेतील या गोष्टींचा अभ्यास करून त्यात आपण आपली प्रगती साधायला हवी.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

म्हणौनि वहिला उठी । मियां मारिले तूं निवटी । 
न रिगे शोकसंकटी । नाथिलिया ।। 477।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - म्हणून लवकर ऊठ, मी यांस ( आंतून ) मारले आहे व तूं यांस बाहेरून मार आणि नसत्या शोकसंकटात पडूं नकोस. 

सविस्तर वाचण्यासाठी इये मराठीचिये नगरी हे अॅप डाऊनलोड करा. 

Search Iye Marathichiye Nagari App on Google Play Store And Download

वाचा सविस्तर विश्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 


Monday, November 16, 2020

सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी : डाॅ. राजीव व्हटकर

 


सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सिंह राशीतून  होणारा उल्का वर्षाव पाहण्याची संधी ३० नोव्हेंबर मिळणार आहे.  मंगळवारी ( ता. १७ ) आणि बुधवारी (ता. १८) रात्री सर्वाधिक उल्कावर्षाव अनुभवण्याची मिळणार आहे. त्यामुळे आजची रात्र अवकाश संशोधक आणि नागरिकांसाठी पर्वणीची ठरणार आहे, अशी माहिती पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.

श्री. व्हटकर म्हणाले, टेम्पल-टटल धूमकेतूने सोडलेल्या धुळीकानाच्या पट्ट्यातून जेव्हा पृथ्वी जाते तेव्हा हे धुळीचे कण पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात. पृथ्वीपासून १२० ते ८० किलोमीटरच्या दरम्यान वातावरणातील हवेच्या बरोबर झालेल्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते, त्यावेळीच त्यांचा वेग ताशी ११ ते ७२ किमी प्रति सेकंद इतका असतो. साधारणपणे  १० ते १५ सेकंदापर्यंत ह्या उल्का जमिनीच्या दिशेने येताना आपल्याला दिसतात. त्यानंतर त्यांचे राखेत रूपांतर होते. त्यातील काही मोठ्या आकाराच्या उल्का संपूर्णपणे न जळता जमिनीपर्यंत पोहोचतात.  

श्री. व्हटकर पुढे म्हणाले, हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी निरभ्र आकाश, सिंह राशी ओळखण्यासाठी आकाश नकाशा व सहनशीलतेची गरज आहे. सर्वप्रथम शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर व उंच ठिकाण निवडावे जेणेकरून स्वच्छ आणि संपूर्ण आकाश दिसेल. शक्यतो एखाद्या उंच इमारतीच्या छतावरुन निरीक्षण करावे. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी काही तास लागणार असल्याने बसण्यासाठी खुर्ची किंवा झोपून निरीक्षण करण्यासाठी चटई इत्यादींचा उपयोग करावा. आकाश नकाशाच्या साहाय्याने सिंह राशी ओळखून त्या दिशेने निरीक्षण करत राहावे. तासाला साधारणपणे १५ उल्का सिंह राशीच्यामधुन बाहेर पडताना दिसतील. सूर्य मावळल्यापासून ते पहाटे सूर्योदयापर्यंत हा उल्कावर्षाव ३० नोव्हेंबरपर्यंत पाहता येईल, असेही श्री. व्हटकर म्हणाले. 

Thursday, November 12, 2020

शिवाजी विद्यापीठातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल




शिवाजी विद्यापीठातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापिठातील वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आज पुणे शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कोल्हापुरातील एका स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ते शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांशी जिव्हाळ्याचे  संबंध या जोरावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंपरागत असलेला राजकीय आणि सामाजिक वारसा तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले जवळचे संबंध या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.

Wednesday, November 11, 2020

लांजा व्हिलेज...हिमालयातील हे एक अफलातून ठिकाण....


 लांजा व्हिलेज...हिमालयातील हे एक अफलातून ठिकाण.... 

हे ठिकाणचे वैशिष्ट्यचं मुळात रात्रीची फोटोग्राफी हे असतं...चारही बाजूने पर्वत आणि मध्येच छोट्याशा जागेत वसलेलं हे काही वीस बावीस घरांच गावं...वाहनांची रेलचेल नसल्याने आणि अतिशय उंचावर असल्याने येथे प्रकाशाचं प्रदूषण अगदीच नगण्य असतं...या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात असलेला एका उंच जागेवर स्थापित केलेला भगवान गौतम बुध्दांचा नितांत सुंदर असा पुतळा..

वाचा सविस्तर  on इये मराठीचिये नगरी 

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

किंवा

  Search Iye Marathichiye Nagari app on Google Play  and Download



Tuesday, November 10, 2020

तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ).

 



तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी.

-    राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

वाचा सविस्तर  on इये मराठीचिये नगरी. अॅप

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

किंवा गुगुल प्ले स्टोअरवर शोधा इये मराठीचिये नगरी अॅप

Monday, November 9, 2020

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 


तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

हे जीवन जगताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण असलो काय अन् नसलो काय हे जग पुढे चालतच राहणार. ही ओळख करून घेऊन आपण स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळखून ते कार्य करायला हवे. म्हणजेच स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. या देहावर विजय संपादन करायला हवा. मगच आपण या विश्वावर विजय संपादन करू. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। 471 ।। अध्याय 11

ओवीचा अर्थ – आणि यांत केवळ रिकामें यशच मिळणार आहे असें नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यांत आलेले आहे. अर्जुना, तूं केवळ नावांला मात्र कारण हो.

आपण फक्त निमित्तमात्र आहोत. ही अनुभुती येणे अध्यात्मिक प्रगतीसाठी खूप गरजेचे असते. एकदा एक राजा जंगलात भटकत असताना त्याला एक सत्पुरुष भेटला. त्याच्या भेटीत त्याचे जीवनच बदलले. राजाने खूप मोठा पराक्रम केला होता. नुकताच त्याचा राज्याभिषेकही झाला होता. राजाने उभा केलेल्या त्या स्वराज्याचा त्याला अभिमानही होता. तसे असणे स्वाभाविकही होते. राजा जेव्हा या साधूपुरुषास भेटला तेव्हा त्या साधू पुरुषाने त्याला फक्त एकच विचारले. तु काय काय जिंकलास ?  राजा गर्वाने म्हणाला. मी अनेक किल्ले जिंकले आहेत. अनेक साम्राज्य माझ्या प्रभावाखाली आहेत. जवळपास आता जिंकायचे काही उरलेच नाही. ही सर्व भूमी ही माझीच झाली आहे. तेव्हा तो साधू पुरुष शांत स्वभावाने त्याला म्हणाला. ठिक आहे. तुझा देह म्हणजे ही सुध्दा एक भूमीच आहे. मग तु ती जिंकला आहेस का ?  राजा थोडा कोड्यात पडला. या साधूंना मी सांगतो आहे. तुम्ही उभी आहात ती भूमी सुध्दा माझी आहे. मग या देहाचे हे काय विचारात आहेत. सगळच जिंकले आहे मग देह कसा काय जिंकला नाही असे का या सत्पुरुषास वाटते. त्याला काहीच समजले नाही. यावर राजा म्हणाला. हे सत्पुरुषा आपण काय बोलत आहात ते माझ्या काहीच लक्षात येत नाही. तरी मला तुम्ही समजावून सांगू शकाल का सत्पुरुष म्हणाला हो जरूर. तु सगळं जग जिकला आहेस. पण स्वतःला तु जिंकला नाहीस. मी स्वतःवर विजय मिळवला आहे. स्वतःवर जेव्हा तू विजय मिळवशील तेव्हा तू सर्व जगावर विजय मिळवला आहेस असो होईल. स्वतःच्या देहातील आत्मा मी जिंकला आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या आत्म्याला तु जिंकू शकला नाहीस. हे जिंकणे तुझे बाकी राहीले आहे. तु स्वतःला जेव्हा जिंकशिल तेव्हा तू खरा आत्मज्ञानी होशील. भूत, भविष्य, वतर्मानावर तुझे राज्य असेल. पण तु अद्याप त्या देहामध्ये अडकला आहेस. देहावर तु विजय मिळवलेला नाहीस. देह आणि आत्मा वेगळा आहे याचे ज्ञानही तुला नाही. राजाला आता देहावर विजय मिळवण्याची इच्छा झाली. त्याने म्हटले जग जिंकले आहे, मग हा देह काय आहे. त्याच्यावरही विजय मिळवू. यावर तो सत्पुरुष म्हणाला, हे राजन तु म्हणतोस तितके सोपे हे नाही. कारण तु मुळात काही जिंकलेच नाही. मी केले मी केले याचा तुला हा अंहकार आहे ना हा प्रथम तुझ्यातून जायला हवा. कारण तु फक्त निमित्र मात्र आहेस. जग जिंकण्यास तु फक्त एक कारण आहेस. स्वराज्य सुराज्य व्हावे यासाठी हे कार्य तुझ्याकडून करवून घेतले आहे. तु यात फक्त निमित्त मात्र आहेस. यावर राजा अधिकच बुचकळ्यात पडला. म्हणाला हे आता नवीन काय सर्व जगाला माहीत आहे. मी या साम्राज्याचा राजा आहे. मीच निर्माण केले आहे हे राज्य. आमच्या पिढ्यान पिढ्या या भूमिवर राज्य करत आल्या आहेत. आणि तु मला मी काहीच केले नाही असे कसे म्हणतोस. मी अन् निमित्तमात्र छे..हे मला पटणारे नाही..यावर तो सत्पुरुष म्हणाला, तु राज्य उभे करण्यासाठी तुला कोणी प्रेरीत केले. तुला कोणी हे कार्य करण्यास सांगितले. तु केले नसतास तरी हे राज्य उभे राहीले नसते असे तुला वाटते काय याचा विचार कर. राजा मेला म्हणून राज्य चालायचे राहात नाही. आज तु राजा झाला आहेस उद्या आणखी कोणी होईल. कोण मेले म्हणून राज्य उभे राहात नाही असे नाही. तुला तुझ्या मानस मातेने हे राज्य उभे करण्यासाठी प्रेरित केले आहे. म्हणजे त्या मातेने हे राज्य उभे केले आहे. त्या मातेचे हे राज्य आहे. तु फक्त तिच्यासाठी निमित्त मात्र झाला आहेस. या मातेने लोक गोळा केले. तुझ्यामागे उभे केले. तुला घडविले. मग तुला असंख्य लोकांनी हे राज्य उभे करण्यात मदत केली. काहींनी तुझ्यासाठी रक्तही सांडले. काहींनी जीवही गमावला. मग हे राज्य तु उभे केले असे कसे म्हणतोस. तु काय केलेस मला सांग. या सर्वात तु निमित्त मात्र आहेस. राज्याला ही गोष्ट पटली. पण देहावर विजय मिळवायचा कसा याचे काही कोडे उलघडले नाही. अखेर राजाने या राज्याचा त्याग करण्याचे ठरवले व सन्यास आश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. राजाने निर्णय घेतला. मी सन्यास आश्रम स्वीकारेन पण जो पर्यंत माझा वारस आत्मज्ञानी होत नाही तोपर्यंत माझा मुख्य वारस हा सन्यास आश्रम स्वीकारेल बाकीचे वारसे राजगादी सांभाळू शकतील. बाकीच्या वारसे सन्यास आश्रमात असतील त्यांना मानाने गादीचा मान देण्यात यावा. भिक मागून कोणी राजा होत नाही. मानाने त्यांना गादी देण्यात आली तरच त्यांनी ती स्वीकारावी. असे काही नियम राजाने केले. पण राजाला एक चिंता सतावू लागलो. तो म्हणाला राज्य सोडल्यानंतर माझ्या वारशांना आपण राजाचे वंशज आहोत याचा विसर पडला तर ते कधीच राजे होणार नाहीत. तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, मेंढ्यांच्या कळपात सिंह जन्माला आला तर तो मेंढ्यासारखे वागतो का सिंहाला पाण्यात पाहील्यानंतर आपण मेंढ्यापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव निश्चितच होते. त्याची डरकाळी ही आपोआप फुटते. तसे राजा सन्यस्थ असला तरी त्याचा राजधर्म त्याच्या सोबत असतो. त्यातून तो स्वतःची ओळख स्वतः करून घेतो. हेच अध्यात्म आहे. स्वःची ओळख करुन घेणे हेच तर अध्यात्म आहे. राजाला त्याची ओळख स्वतःच होते. त्याला आपण राजे आहोत असे सांगावेही लागत नाही. म्हणूनच म्हटले हे जीवन जगताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण असलो काय अन् नसलो काय हे जग पुढे चालतच राहणार. ही ओळख करून घेऊन आपण स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळखून ते कार्य करायला हवे. म्हणजेच स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. या देहावर विजय संपादन करायला हवा. मगच आपण या विश्वावर विजय संपादन करू. प्रत्येकाने या विश्वावर विजय संपादन केला आहे. फक्त निमित्त मात्र होऊन त्याची ओळख करून घ्यायची आहे. मग जो वारस हे जिंकेल त्याला हे राज्यच काय सर्व विश्वच त्याचे होईल. यासाठीच केवळ निमित्त मात्र व्हायचे आहे. आणि अध्यात्मिक प्रगती साधायची आहे. स्वःची ओळख जेव्हा होईल तेव्हा आत्मज्ञानाने तो निश्चित म्हणेल आणि ओळखेलही हे राज्य माझ्या पुर्वजाने एका मातेच्या इच्छेसाठी, तिच्या मार्गदर्शनाने उभे केले होते. मी फक्त निमित्त मात्र होतो. कर्ता करविता ती माता होती. मातेच्या रुपात स्वयं भगवान कृष्ण होते.   

 

 

  

  

Friday, November 6, 2020

कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान

 


राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस 7 नोव्हेंबर 


कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान 

कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो.
लेेेखन - प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे 
सहाय्यक प्राध्यापक
सांगोला महाविद्यालय, जि. सोलापूर
मोबाईल नंबर 9822119330
.................................

जागतिक वार्षिक मृत्यूदरामध्ये हृदयरोगानंतर दुसरा क्रमांक हा कर्करोगाचा आहे. मानवी शरीर हे सुमारे दशलक्षाहून अधिक प्रकारच्या विविध पेशींपासून बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना पेशींचे विभाजन हे कठोर नियंत्रणात असते. मात्र या नियंत्रण व्यवस्थेमध्ये काही कारणांनी बिघाड झाल्यास पेशींची अनियंत्रित विभाजन होऊन वाढ होते या अवस्थेस कर्करोग असे म्हणतात. कर्करोग हा एक जटिल आजार आहे. कर्करोग (कॅन्सर) हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ खेकड्याच्या चाव्याप्रमाणे वेदना होण्याच्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे.पुरातन काळापासून कर्करोगाने मानवांवर परिणाम केला आहे परंतु गेल्या शतकात मृत्यूच्या उच्च दराचे हे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. कर्करोगाचा परिणाम व्यक्तींच्या कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, परंतु वृद्धापकाळातील लोकांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. एपिडेमियोलॉजिकल आणि एटिओलॉजिकल अभ्यासानुसार स्पष्टपणे निदर्शनास आले आहे की वय वाढल्यामुळे कर्करोगाच्या घटनांचा धोका वाढतो.

कर्करोग निर्माण होण्याच्या प्रक्रियेस कार्सिनोजेनेसिस असे संबोधितात. कॅन्सर होण्यास कारणीभूत घटकांना कार्सिनोजेन संबोधितात. विसाव्या शतकात सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली. यामुळे वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे आणि शेवटी कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

कर्करोगावर विजय मिळविण्याच्या मुख्य ध्येयासाठी अद्याप मानवी समाज संघर्ष करीत आहे. सामान्य पेशी या कर्करोगाच्या ऊतकात रूपांतरित होतअसतात. कर्करोगाच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या केमोथेरपी औषधे ही वेगाने विभाजन होणाऱ्या पेशीविरूद्ध सक्रिय असतात. ही औषधे कर्करोगाच्या पेशी तसेच सामान्य पेशी, विशेषत: केसांच्या फोलिकल्स, हाडांमधील रक्त पेशी आणि शरीरातील वेगाने विभाजित होणाऱ्या पचनसंस्थेच्या पेशी नष्ट करतात. गंभीर आणि विषारी दुष्परिणामांमुळे उपचारांची प्रभावीता गंभीरपणे मर्यादित राहते कारण रासायनिक औषधे कर्करोग आणि सामान्य पेशींमध्ये भेद करण्यास अक्षम आहेत. 

कर्करोगाचे पाच प्रकार


1) कार्सिनोमा: शरीराच्या अवयवांच्या बाहेरील स्तरांमध्ये कार्सिनोमाची सुरूवात होते. हा एखाद्या अवयवामध्ये किंवा ग्रंथीमध्ये विकसित होतो किंवा स्त्राव, फुफ्फुस, गर्भाशय, आतडे आणि मूत्रमार्ग यासारख्या स्राव करण्यास सक्षम असलेल्या अवयवांच्या बाह्यआवरणामध्ये उद्भवतो 

2) सॅक्रोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू आणि नसा सारख्या हाडांच्या मज्जाच्या बाहेरील सहाय्यक आणि संयोजी ऊतकां मध्ये व पेशींमध्ये उद्भवतो. सामान्यत: सॅक्रोमा मोठ्या प्रमाणात वेदनादायी असणारा कर्करोग आहे. 

3) लिम्फोमा: हे रक्त पेशींचे ट्यूमर असतात जे लिम्फॅटिक नोड्‌स आणि इम्यून सिस्टमच्या ऊतकांमध्ये उद्भवतात. 

4) ल्युकेमिया: हा कर्करोग हाडांच्या पोकळीतील रक्तपेशींमध्ये सुरू होतो आणि रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या श्वेत रक्त पेशींच्या असामान्य वसाहतींचे अत्यधिक उत्पादन करतो.. 

5) अडेनोमा: या प्रकारात ग्रंथीच्या पेशींमध्ये तयार होणारे ट्यूमर जसे स्तन, पिट्यूटरी, थायरॉईड, यकृत,अधिवृक्क, लाळ उत्पादक ग्रंथी इ. समावेश होतो 

कर्करोगाची कारणे 


अ) अनुवांशिक घटक 

1) प्रोटो-ऑन्कोजेन्सः प्रोटो-ऑन्कोजेन्समधील उत्परिवर्तन ऑन्कोजेन तयार करतात ज्यामुळे कर्करोग होतो. 

2) ट्यूमर सप्रेसर जीन्स: हे जीन्स पेशींचे विभाजन थांबवण्यासाठी आदेश देतात आणि पेशींच्या मृत्यूचे नियमन करतात. ट्यूमर सप्रेसर जीन्समधील परिवर्तनांमुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि कर्करोग होतो. उदा. पी-57, रास. 

3) सुसाइड जीन्स: या जीन्समध्ये उत्परिवर्तन झाल्यास पेशींचा नाश होतो आणि जर यामध्ये बदल झाले तर पेशी मरत नाहीत परंतु वेगाने विभाजित होतात व कर्करोग होतो. 

4) डीएनए-दुरुस्ती जीन्स: हे पेशींमध्ये खराब झालेले डीएनए दुरुस्त करतात. जर ही जनुके उत्परिवर्तित झाल्यास, ते कर्करोगास कारणीभूत असणा-या डीएनए नुकसानीस दुरुस्त करण्यात अक्षम ठरतात व कर्करोगाची सुरुवात होते. 

ब) कार्सिनोजेन्सः कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो. 

कार्सिनोजेन प्रकारावर आधारित, कार्सिनोजेनेसिसची प्रक्रिया विविध विभागांमध्ये विभागली गेली आहे. ते विभाग असे - 

1. रासायनिक कार्सिनोजेनेसिसः 

यामध्ये सेंद्रिय संयुगे, खनिजे, फूड कार्सिनोजेन, तंबाखू (निकोटिन), तंबाखूचा धूम्रपान, एस्बेस्टोस, ऑटोमोबाइल्सच्या एक्‍झॉस्ट धूर, डिझेल एक्‍झॉस्ट पार्टिक्‍युलेट्‌स, आर्सेनिक, निकेल इत्यादींचा समावेश आहे. सामान्यत: ज्ञात कार्सिनोजेनमध्ये एस्बेस्टोस, आर्सेनिक, बेंझिन, 

प्लास्टिक मधील बिस्फेनॉल ए (बीपीए), कीटकनाशके, डायऑक्‍सिन, अतिनील किरणे, पॉलीब्रॉमिनेटेड डायफेनिल एथर्स (पीबीडीई), तंबाखूचा धूर आणि पॉलिसायक्‍लिक, अरोमेटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच), अस्थिर सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) यांचा समावेश आहे. बेंझोपायरिन या तंबाखूच्या धुम्रपानात असणाऱ्या पॉलिसायक्‍लिक सुगंधी हायड्रोकार्बनमुळे रासायनिक कार्सिनोजेनेसिस प्रक्रियेतून मुखाचा कर्करोग होऊ शकतो. 

2. आयनीकरण किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या तुलनेत आयनीकरण किरणें अत्यंत ऊर्जावान असतात. एक्‍स-रे, गॅमा किरण आणि इतर आयनीकरण किरणांमुळे डीएनएमध्ये अनुवांशिक बदल होतात. रेडिएशन प्रेरित कार्सिनोजेनेसिस दरम्यान, पाण्याच्या रेणूंनी उर्जा नष्ट होण्यामुळे पाण्याचे आयनीकरण होते आणि विरघळलेल्या इलेक्‍ट्रॉनसह मुक्त रॅडिकल्स तयार होतात. या मुक्त रॅडिकल्समुळे डीएनएच्या रचनेत बदल होतात 

3. अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

मानवी त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे अतिनील किरणोत्सर्गाचा संसर्ग. बेसल सेल कार्सिनोमा (बीसीसी) आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (एससीसी) हे पूर्वी निदान झाल्यास त्यांचे उपचार केले जाऊन बरे होऊ शकतात. शरीरभर पसरण्याची त्यांची क्षमता खूपच कमी आहे. क्‍यूटानियस मॅलिग्नंट मेलानोमा (सीएमएम) त्वचेचा प्राणघातक कर्करोग आहे.त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित मृत्यूमध्ये 75 टक्के मृत्यू यामुळे होतात. 

4) बायोलॉजिकल कार्सिनोजेनः यामध्ये निकोटिन, स्ट्रेप्टोमायसिस सारखे वनस्पती, प्राणी व किटकांमधील दूषित घटक आहेत कीटकांचे क्विनोन आणि ट्रामाटोड्‌स सारख्या परजीवी विषारी पदार्थांचाही यामध्ये समावेश होतो. 

5) ऑन्कोजेनिक विषाणू: या विषाणूंमुळे यजमान पेशींमध्ये कर्करोग होण्याची शक्‍यता असते अशा स्वरुपाचा आणि जीवरासायनिक बदल होऊ शकतो. उदा. लैंगिक अवयवांचा कर्करोग हा ह्यूमन पॅपिलोमा विषाणूमुळे होतो. 

6) वय: कर्करोगाचा धोका वाढत्या वया प्रमाणे वाढतो परंतु तो कोणत्याही वयात तो उद्भवू शकतो. 

7) जीवनशैली: जास्त मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. 

8) पोषणः लाल मांसाशी संबंधित आहार, उच्च कॅलरी आणि भाज्या व फळांचा अभाव यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आहारातील खराब सवयींमुळे लठ्ठपणात वाढ होऊन स्तन, गर्भाशय आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढते 

9) रोगप्रतिकारक यंत्रणा: दुर्बल रोगप्रतिकारक यंत्रणाअसलेल्या लोकांना लिम्फोमासारखे कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते. 

कर्करोगाचा प्रतिबंध 


कर्करोगाचा उपचार करण्यापेक्षा त्याला होण्यापासून प्रतिबंध करणे हे उत्तम आहे. हा एक जटिल प्रकाराचा आजार आहे. याला आंतरिक घटक जनुके, जीवनशैली, वय आणि बाह्यपर्यावरणीय घटक जबाबदार असतात. त्यापैकी एक किंवा बरेच घटक कर्करोग होण्याचा धोका निर्धारित करतात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी म्हणून घेतलेल्या उपायांना कर्करोग प्रतिबंध म्हणतात. यामध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, जास्त प्रमाणात धूम्रपान व मद्यपान न करणे, निरोगी वजन राखण्यासाठी शारीरिक हालचाली व योग्य व्यायाम करणे, नियमित लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. 

(लेखक हे कॅन्सर संशोधक आहेत.) 

विश्वरुपाकडे असे पाहावे...( एकतरी ओवी अनुभवावी)

 

विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तरि मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । 

सैंध पसरिलीं आणि तोंडे । आतां ग्रासीन हें आघवें ।। 451 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - तर अरें, मी काळ आहें हें पक्के समज, मी जगाचा नाश करण्याकरितां मोठा होत आहे. माझी तोंडे चहुकडे पसरलेली आहेत व मी ( त्या तोंडांनी ) हे सर्व आतां गिळून टाकीन. 

दुष्टांच्या सहाराकरिता भगवंताचा अवतार होतो. मग हा भगवंत कोणाच्याही रुपात प्रकट होऊ शकतो. कारण तो सर्वांमध्ये आहे. विश्वरुप हे काही भिती दाखवण्यासाठी नाही. तर आपणाला जागे करण्यासाठी आहे. हे जाणून घ्यायला हवे. विश्वरुपाने दहशत निर्माण होत नाही तर जागृती येते. माणसाला त्याचे खरे स्वरुप समजावून सांगण्यासाठी विश्वरुप दर्शन आहे. सध्याच्या काळात म्हणाल, तर निसर्गाचा प्रकोप असेल किंवा एखादा महामारीसारखा आजार असेल. हे पूर्वीच्या काळीही होते. पण ही संकटे माणसाला भानावर आणण्यासाठी आहेत. माणसा माणसातील वाढत चाललेला दुरावा दूर करण्यासाठीही आहेत. माणसात माणूसकी निर्माण करण्यासाठी आहेत. यादृष्टिने त्याकडे पाहायला हवे. आपण या संकटाकडे कसे पाहातो यावरही सर्व काही अवलंबून आहे. संकटाकडे सकारात्मकदृष्टिने पाहिल्यास त्यातील समस्या सहज सुटु शकतात. नकारात्मक दृष्टिने पाहिले तर समस्या वाढतच राहतात. आलेली संकटे झेलायला शिकले पाहिजे. हसत हसत त्यांना सामोरे जायला हवे. मनाला विचलित न होऊ देता त्यांचा सामना करायला हवा. विश्वरुपदर्शनाकडेही जसे आपण पाहातो तसेच या समस्यांकडे पाहायला हवे. विश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल. सुख होऊ दे किंवा दुःख होऊ दे. दोन्ही गोष्टीने मन विचलित होता कामा नये. मनाची स्थिरता दोन्ही गोष्टीमध्ये सारखीच ठेवायला हवी. मनाचा समतोल साधता आल्यास आपली प्रगती होईल. अध्यात्मिक विकासात या गोष्टींना महत्त्व आहे. आपण काही करत नाही. हे माझ्यामुळे झाला हा आपला अहंकार आहे. मी याला मारले. त्याला मारले. या सर्व अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्यातील अहंकार जायला हवा. म्हणजेच आपल्यातील मी पणा जायला हवा. हा अहंकार, मीपणा, क्रोध गिळायला आपण शिकले पाहीजे. तो पचवायला आपण शिकले पाहीजे. हे आपण जर करू शकलो. आपण हा आपल्यात बदल घडवू शकलो, तर आपण निश्चितच प्रगती करू शकू. आत्मज्ञान प्राप्तीसाठी याची गरज आहे. 


Monday, November 2, 2020

विश्वरुपातील उग्ररुप (एक तरी ओवी अनुभवावी)

 



चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल ८९९९७३२६८५

किती  वाढविसी या उग्ररुपा । अंगीचे भगवंतपण आठवीं बापा ।

नाहीं तरि कृपा । मजपुरती पाहीं ।। 443 ।। अध्याय 11 वा


ओवीचा अर्थ - या उग्ररुपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण ( पालन करण्याचा स्वभाव ) आठव. नाहीतर तसें करण्याचें आपल्या मनांत नसेल तर माझ्यापुरती तरी कृपा कर.


आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग उभे राहात असतात. या प्रसंगांना घाबरून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जायचे असते. या प्रसंगांनी भितीने थरकाप उडतो. निसर्गाचे उग्ररूप तर नेहमीच आपणाला अनेक आव्हाने उभे करते. पूर, भुकंप, साथीचे आजार, अपघात अशा आपत्तीने जीवन चिंताजनक होते. असे प्रसंग नैसर्गिक असतात. ते कोणी घडवत नाही. निसर्गाचा हा प्रकोप अंगावर शहारे आणतो. निसर्गाच्या या प्रकोपापुढे कोणाचेही चालत नाही. पाण्याची शक्ती, वीजेची शक्ती, वाऱ्याची शक्ती, पृथ्वीच्या पोटातील ज्वालामुखीची शक्ती अशा या शक्तीचे उग्ररुप आपणास देवाची आठवण करून देते. म्हणजे या शक्तीचा कर्ता करविता कोणी आहे असे समजून त्याला आपण शरण जातो. खरचं देव आहे की नाही माहीत नाही. पण ही शक्ती आहे. त्या शक्तीची ओळख आपणास या उग्ररुपातून होतो. त्याची अनुभुती येते. पण आपल्यामध्येही एक शक्ती आहे तिची ओळख आपण करुन घेत नाही. त्या शक्तीची ओळख व्हावी यासाठी ही अनुभुती आहे. असे मानायला काहीच हरकत नाही. भितीने आपण त्या शक्तीला शरण जातो. पण प्रत्यक्षात या सर्वाचे प्रयोजन आपल्यातील अंहकार, गर्व, मोह, माया घालवण्यासाठी आहे. ही अनुभुती आपणास आपल्याला स्वः ची ओळख करून देण्यासाठी आहे. ही शक्ती तुझ्यातही आहे असे भगवंतांचे सांगणे आहे. त्याची जाणीव करून घेण्यासाठी या विश्वरुपाचे दर्शन आहे. देवात जो आत्मा आहे, तोच समस्त मानवात आहे. देव म्हणजे समस्त मानवात असणारा आत्मा आहे. सर्वांमध्ये तो आहे. तो वेगवेगळ्या रुपात आहे. वेगवेगळ्या शक्तीच्या रुपात तो आहे.  या शक्तीचा वापर चांगल्यासाठीही होतो आणि वाईटासाठीही होतो. फक्त आपण तो वापर कशा पद्धतीने करायचा यावर ते अवलंबून आहे. वाऱ्याच्या वेगाने नुकसान होते. पण त्याच वाऱ्यापासून पवनचक्की चालते. वीज निर्मिती करता येते. पाण्याची शक्तीही तशीच आहे. त्यापासूनही वीजेची निर्मिती होते. ही शक्ती एकातून दुसऱ्या प्रकारामध्ये परावर्तीत होते. तसे आपणही आपल्यात असणारी ही शक्ती चांगल्या गोष्टीच्या निर्मितीमध्ये परावर्तीत करायला हवी. जैवविविधतेमध्ये प्रत्येक वनस्पतीचे महत्त्व आहे. मग ती विषारी असो वा बिनविषारी. मृतावस्तूवर जगणारी असो वा जमिनीवर वाढणारी असो. परोपजिवी असो वा स्वयंउर्जीत असो. प्रत्येकाचा काहीना काही फायदा आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक वस्तूत औषधी गुणधर्म आहेत असे म्हटले आहे.  हे जसे आहे तसेच आपल्यातही चांगले गुणधर्म आहेत. म्हणजेच आपण आपल्यातील सात्विक भाव जागृत करायला हवेत. आपल्यात असणारी ही शक्ती आपण सात्विक भावात परावर्तीत करू शकतो. सात्विक विचारातून, आचारातून आपल्यातील अध्यात्मिक विकासास चालना मिळेल. आत्मज्ञानाची प्रचिती येते. भगवंताचे उग्ररुप आपण आध्यात्मिक विकासात परावर्तीत करू शकलो तर आपणास निश्चितच आत्मज्ञानाचा लाभ होईल. याचा अर्थ आपल्या आसपास घडणाऱ्या वाईट घटनातून आपण विचलित न होता. त्यांना चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी. आपल्यातील भगवंतपण आपण सदैव जागृत ठेवायला हवे. माणसाला भगवंतरुपाची, चांगल्याची प्रचिती आणण्यासाठी विश्वरुपातील उग्ररुपाचे दर्शन आहे. आपल्यातील भगवंत जागा करण्यासाठीच हे सर्व आहे. हे जाणून घेऊन आपण आपली अध्यात्मिक प्रगती साधायला हवी.


द सेकंड सेक्स



द सेकंड सेक्स

लेखिका : सिमोन द बोव्हुआर

अनूवाद : करुणा गोखले 


सिमोन द बोव्हुआरचे *द सेकंड सेक्स* हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते. स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांनी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही, तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो. याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्थिमित होतो. सिमोनची निरीक्षण शक्ति आणि सैद्धांतिकरन यांची ताकद एवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते. जगभर गाजलेला हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 

द सेकंड सेक्स

लेखक : सिमोन द बोव्हुआर

अनुवाद : करुणा गोखले

 मूळकिंमत : 600 रु 

टपालखर्चासह किंमत : 540 रु 

घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क *सहित वितरण* 9960374739 / 9096399397

Whatsapp link : https://wa.me/919960374739

स्क्रीन टाईम


स्क्रीन टाईम

लेखक : मुक्ता चैतन्य

'हे बघू नकोस, ते बघू नकोस,' असं सतत मुलांना सांगून मुलं कुठली ऐकायला ? त्यापेक्षा इंटरनेटच्या जादुई दुनियेची सफर सुरक्षितपणे कशी करायची, हे आई-बाबांनीच त्यांना शिकवलं तर? 

काय बघायचं नाही' याची नकारघंटा वाजवत राहण्यापेक्षा 'काय बघायंच ?' हे मुलांच्या बरोबर आपणही शोधलं तर? समजून घेतलं तर? 

काॅम्प्युटरच्या पडद्यावरच्या हलत्या 'खिडक्या' बंद केल्या, तर मुलं हट्टानं त्या उघडणारच,  आपण त्यांना दारचं उघडून देऊ शकतो. . .  कशी?  तेच उलगडून सांगणारं पुस्तक ! 

सायबर स्पेसचे किचकट प्रश्न सोडवण्याचे सोपे मार्ग अगदी साध्या सोप्या भाषेत आणि वेगवेगळ्या मार्गदर्शक 'खिडक्यां'ची माहिती मुलांपर्यत व पालकांपर्यत पोहोचवणारे मार्गदर्शक . 

संपूर्ण कुटुंबाला सजगपणे आभासी जगाची भटकंती करायला प्रव्ृत्त करणारं पुस्तक !

स्क्रीन टाईम

लेखक : मुक्ता चैतन्य

मूळ किंमत : 200/- रु

सवलत व टपालखर्चासह किंमत : 170/- रु


घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क *सहित वितरण* 9960374739 / 9096399397

whatsapp link : https://wa.me/919960374739