Thursday, October 22, 2020

गोंधळ ( प्रतिमा इंगोले)

 




गोंधळ 


माये!तुझं रूप मनामनात 

आरती घुमायची कानात 


एकदा नागवेलीच्या 

हिरव्या तांड्यात..

मन दचकलं

तूच दिसू लागली 

पानापानात...


तान्डभर सळसळ

हवेची झुळूक...

मनावर शहारा 

भीतीची चुणूक...


बया दार उघड 

बया दार उघड 


संतांची वाणी

दाटते उरात

कळ लागते  जीवघेणीे 


माये इथे तर 

सदाचीच फरफट

जिवाला काचणी

कोणापुढे घालावा

गोंधळ, तर

त्यांचीच मनमानी


शेवटी तुझाच

केवळ आधार 

निदान मन मोकळं 

करण्याचा पार..

बुडत्याला काडीचा आधार!


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.

No comments:

Post a Comment