Wednesday, October 21, 2020

झाकलप ( प्रतिमा इंगोले )

 


झाकलप


माये आजकाल तशी 

झाकलपच फार...


अशावेळी संवाद 

होतो एक व्यवहार 

मन उलून येईल असं 

कोणी भेटतच नाही बघ 


तशी तू घेतेस कैवार

कधी मधी

निदान तसं वाटतं

अधी मधी...


तेही खूप पुण्याईचं 

तसं कोण मायेचं?

पण आजकाल 

आधार सुटल्यागत होतं 


मन उगाच 

थरथरू लागतं

आजचा दिवस निभला

पण उद्याचं काय?


अशावेळी तूच आठवू 

लागते महामाय!

भवताली परका माहोल 

मन होतं पाकोळी 

भिरभिरू लागतं 


सगळ्या वळचणी

ताब्यात घेतलेल्या 

अंगण तेही पारखं झालेलं...


प्रतिमा इंगोले.  ९८५०११७९६९

No comments:

Post a Comment