कोल्हापूर ः "सकाळ'चे उपसंपादक राजेंद्र घोरपडे यांच्या "इये मराठीचिये नगरी' या
पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते
झाले. या वेळी विकास पाटील, डॉ. नारायण शिसोदे, प्रकाश भागवतवार, अरुण नरके,
मल्हारीगौडा पाटील, उमेश पाटील, राजेंद्र घोरपडे.
तीन पुस्तकांचे प्रकाशन,
सात शेतकऱ्यांचा गौरव
- शेती प्रगती मासीकाचा आठवा वर्धापनदिन
कोल्हापूर, ता. 25 ः "सकाळ'चे उपसंपादक राजेंद्र घोरपडे यांनी लिहिलेल्या "इये मराठीचिये नगरी' या पुस्तकांसह सुधीर कुलकर्णी यांचे "शेतीची काटेरी वाट' व प्रताप चिपळूणकर यांचे "तण देई धन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच सात शेतकऱ्यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम येथील अप्पाज कॉम्प्लेक्स येथे उत्साहात झाला
तेजस प्रकाशनतर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली. "शेतीप्रगती' मासिकाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब पुजारी यांनी केले.
पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश भागवतवार, गोकुळ संचालक अरुण नरके, कर्नाटकचे माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील उपस्थित होते.
प्रारंभी शेतीप्रगती मासिकाचे संपादक पुजारी यांनी प्रास्ताविक केले. शेतीत वेगळे प्रयोग करणाऱ्या पाच शेतकरी आणि दोन विस्तार कार्यकर्त्यांचा पुरस्काराने सपत्नीक सन्मान केला. यात भूपाल खामकर (जयसिंगपूर), सुरेंद्र बाबू शिरगावे (गणेशवाडी), जंबू आप्पा भोकरे (कुंभोज), दिनकर कांबळे (किरवे), नितीन लोकापुरे (कुपवाड), सतीश देशमुख (शिरोळ) आणि दिलीप घाटगे (मिणचे) यांचा या वेळी गौरव केला. "बदलते जग'च्या संपादिका अस्मिता पुजारी यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment