Thursday, November 16, 2023

‘दुर्गांच्या देशातून… ची तपपूर्ती- -


 ‘दुर्गांच्या देशातून… ची तपपूर्ती- - 

‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षी सर्व लेखकांनी या अंकात प्रथमच लिहिले आहे. या नव्या-जुन्या लेखकांनी वेळात वेळ काढून लेख दिल्यामुळेच हा अंक सजला आहे. या अंकातील लेख अन् लेखकांविषयी…

वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून

https://iyemarathichiyenagari.com/durganchya-deshatun-dipawali-ank-comment-sandeep-tapkir/ 


ताज्या अपडेट मिळण्यासाठी Follow the इये मराठीचिये नगरी on WhatsApp:

 https://chat.whatsapp.com/JsWNWp6lxLDE3wCe8j62BN


इये मराठीचिये नगरी फेसबुक पेजला लाईक करा

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari

Monday, May 31, 2021

क्रिया पालटे तात्काळ - दासबोधावर आधारलेली कथा

 


क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था -*

नमस्कार मित्रांनो- मी अविनाश हळबे.

आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ – मागच्या भागात आपण मी विनयला दासबोध भेट दिल्यावर त्याच्यात होऊ लागलेले परिवर्तन आणि त्याबद्दलचे त्याचे प्रांजळ मनोगत बघितले.आज ऐकुया चौथा आणि शेवटचा भाग

दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा...


सर्वभाग एकाच लिंकमध्ये 


*लाईक करा इये मराठीचिये नगरीचे फेसबुक पेज...*
अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांवरील लेख, तसेच विविध विषयावरील प्रबोधनात्मक लिखाण वाचण्यासाठी लाईक करा इये मराठीचिये नगरीचे फेसबुक पेज...
Like the page

Wednesday, May 26, 2021

आर्क्टिक सर्कल वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ) -



 येत्या शनिवारी अनुभवा आर्क्टिक सर्कलमधील नॉर्दन लाईट्स व 24 तासांचा अंधार...

पृथ्वीच्या उत्तर टोकावरील आर्क्टिक सर्कलमधून मध्यरात्रीचा सूर्य पाहिल्यानंतर आता वेध लागले होते, तेथूनच उणे 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमानात भटकंती करून आकाशातील रंगांची उधळण म्हणजेच नॉर्दन लाईट्स व 24 तासांचा अंधार पाहा..आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून येत्या शनिवारी इये मराठीचिये नगरीवर...तर मग पाहायला विसरू नका इये मराठीचिये नगरीचा पर्यटन सेक्शन..

आर्क्टिक सर्कल वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ) - 

पृथ्वीच्या उत्तर टोकाच्या म्हणजे आर्किट सर्कलच्या सफरीमध्ये मध्यरात्रीचा सूर्य आणि नॉर्दन लाईट्स याबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून…

http://iyemarathichiyenagari.com/mid-night-sun-on-arctic-circle-jaiprakash-pradhan-article/

दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया-(व्हिडिओ) - 

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिली या दोन राष्ट्रातील पॅटॅगोनिया प्रदेश हा अॅडिज पर्वतरांजी, मोठे ग्लेसिअर्स, वाळवंट, विस्तिर्ण गवताळ प्रदेश अशा वैशिष्ठ्यांनी नटलेला आहे. भारतात तो पर्यटनासाठी फारसा परिचित नाही. पण आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी तेथे चार आठवड्यांची भटकंती केली. या त्यांच्या भटकंतीबद्दल पाहा या व्हिडिओमध्ये तसेच जाणून घ्या हा प्रदेश…

http://iyemarathichiyenagari.com/patagonia-beautiful-nature-rich-in-south-america/ 

अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ) -

लाॅकडाऊनच्या कालावधीत घरी असला तरी, घरबसल्या पहा पृथ्वीतलावरील सातवा खंड. मनुष्यवस्ती नसलेल्या व ९८ टक्के बर्फाच्छादित अंटार्क्टिकाची रोमहर्षक, चित्तथरारक सहल…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंतीमध्ये…आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओद्वारे…हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा तसेच व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका...

http://iyemarathichiyenagari.com/antarctica-tour-video-by-jaiprakash-pradhan/


केप हॉर्न-पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ) - 

केप हॉर्न  पृथ्वीचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच्यापुढे  महाभयानक असा हा ड्रेक पॅसेज आहे. खलाश्यांचे कबरस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. या जागेला असे नाव का मिळाले ? येथे प्रवास करणे मोठे जिकिरिचे असते.  ४० फुट प्रचंड लाटा, १२५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अन् त्यात हिमवृष्टी असा हा चित्तथरारक प्रवास व या पृथ्वीवरील गुढ ठिकाणांबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून या व्हिडिओमधून. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते सांगा तसेच सबक्राईब करायलाही विसरू नका...

http://iyemarathichiyenagari.com/cape-horn-a-mysterious-place-on-earth-article-by-jaiprakash-pradhan/


जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव- (व्हिडिओ)

पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचे शेवटचे गाव प्युर्टो विल्यम्स आणि शेवटचे शहर उश्वायाची प्रत्यक्ष सफर करण्याचा अनुभव अत्यंत दुर्मिळ अशा छायाचित्रासह या व्हिडिओमधुन घेऊ शकाल.. जयप्रकाश प्रधान यांचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते सांगा तसेच सबक्राईब करायलाही विसरू नका...

http://iyemarathichiyenagari.com/puerto-william-village-in-chile-at-south-pole-article-by-jaiprakash-pradhan/

इये मराठीचिये नगरी

अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. पाहण्यासाठी करा लिंकवर क्लिक...

http://iyemarathichiyenagari.com/

Saturday, May 22, 2021

#WorldBiodiversityDay जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने...

 



जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने...


आंबोलीचा निसर्ग ड्रोनच्या नजरेतून- - 

http://iyemarathichiyenagari.com/drone-view-of-amboli-western-ghat-region/ 


Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज - 

http://iyemarathichiyenagari.com/need-for-maha-tree-conservation-for-sahyadri-bhushan-dhanesha/ 


गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती - 

http://iyemarathichiyenagari.com/300-species-found-on-bhudargad-fort-need-of-conservation-of-biodiversity-on-fort/ 


जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ) - 

http://iyemarathichiyenagari.com/biodiversity-place-in-wester-ghat-drone-view-of-tilari/  


आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य-(व्हिडिओ) - 

http://iyemarathichiyenagari.com/beauty-and-biodiversity-of-amba-ghats-region/ 


कोकणी जैवविविधेतेचे दर्शन घडवणारे हटके पर्यटन- - 

http://iyemarathichiyenagari.com/conservation-of-biodiversity-message-from-konkan-tourism/ 


अनुस्कुरा घाटात ढगांची सफर ड्रोनच्या नजरेतून-( व्हिडिओ) - 

http://iyemarathichiyenagari.com/cloud-beauty-in-anuskura-ghat/ 


Photos : महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव- - 

http://iyemarathichiyenagari.com/trees-found-in-maharashtra-book-by-dr-madhukar-bachulkar-cholekar/ 


मांसाहारी वनस्पती असणारा हा तलाव आहे कोठे ? - 

http://iyemarathichiyenagari.com/know-about-ramsar-site-bhoj-wetland-bhopal/ 


निसर्ग मित्र- जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा - 

http://iyemarathichiyenagari.com/environmental-conservation-by-ngo-nisarg-mitra-in-kolhapur/ 


गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर - 

http://iyemarathichiyenagari.com/blank-panther-found-in-konkan-article-by-pratik-more/ 


सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना - 

http://iyemarathichiyenagari.com/sahyadri-conservation-reserve-concept/ 


श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. 

संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 

मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685




Monday, February 8, 2021

टाकावू वस्तूपासून सजवली सुंदर बाग…(व्हिडिओ)

 


आपल्याकडे घरात अनेक टाकावू वस्तू असतात. पण त्याचा उपयोग आपण कोठेच करत नाही. हा कचरा आपल्या घराचे सौंदर्य सुद्धा बिघडवतो. त्यामुळे हा कचरा फेकून देणे किंवा भगारात देणे याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला तर अशा कचऱ्याचाही सुंदर वापर आपण करु शकतो.

कोल्हापूर गार्डन्स क्लबच्या सदस्या कल्पना थोरात यांची ही बाग पाहून आपणास त्याचा प्रत्यय निश्चितच येईल. त्यांनी चक्क टाकाऊ वस्तुपासुन सुध्दा आपली बाग सजवली आहे. त्यांनी ही बाग कशी सजवली आहे आणि टाकावू वस्तूंचा पुर्नवापर त्यांनी कसा केला आहे. हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून या व्हिडिओच्या माध्यमातून…पाहण्यासाठी करा लिंकवर क्लिक...

http://iyemarathichiyenagari.com/kalpana-thorat-innovation-beautiful-garden-decorated-from-waste-video/

Friday, February 5, 2021

सातारच्या डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर

 



सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

सातारा येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ आणि ‘सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात येतात. यंदा जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला आहे.

कोणत्या साहित्यकृतींचा यामध्ये समावेश आहे?. कोणत्या लेखकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.? 

सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

http://iyemarathichiyenagari.com/dr-shivajirao-chavan-library-satara-award-declared/

आरोग्यासाठी डाळींब कसे फायदेशीर आहे ?

 


डाळींबाचे फायदे काय आहेत ? आरोग्यासाठी डाळींब कसे महत्त्वाचे आहे? डाळींबात कोणते घटक आहेत ज्यामुळे तुमच्या सौंदर्यांत भर पडते? कर्करोगावर व वजन कमी करण्यात कसा फायदा होतो ? यासह अनेक गोष्टी जाणून घ्या डाॅ. निता नरके यांच्याकडून…त्यासाठी पाहा हा व्हिडिओ…

http://iyemarathichiyenagari.com/benefits-of-pomegranate-for-health-tips-by-dr-neetta-narke/

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

Monday, January 25, 2021

शेतीतील पद्म पुरस्कार-



 शेतीतील पद्म पुरस्कार-

शेतीमध्ये अतुलनिय योगदान देणाऱ्या व्यक्तिंना पद्म पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. कोण आहेत हे सन्माननिय जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून...

http://iyemarathichiyenagari.com/2021/01/25/padma-awards-2021-in-agriculture-sector

#PadmaAwards #PadmaAwards2021 #happyrepublicday #padmaawards2021 #agriculture

ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com



लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

 


लक्ष्मी या नीला नातू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) झाले. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा नीला नातू यांनी प्रस्तावनेत दिलेला हा परिचय….

लक्ष्मी - स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा - http://iyemarathichiyenagari.com/2021/01/23/laxmi-book-by-neela-natu-stories-of-women-life/

ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/



कापडी मास्कवर रसायनांच्या थराचा वापरामुळे विषाणूंचा 99.9999 टक्के नायनाट

 


कपड्यावरील विषाणू आणि बँक्टेरिया सहजासहजी मारले जावेत यासाठी ठराविक रसायनाचा थर कपड्यावर वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे विषाणू मारणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भातील एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. काय आहे तंत्राज्ञान? त्याचे फायदे काय ? यावर माहिती सांगणारा हा लेख…


राजेंद्र कृष्णराव घोरपडे


http://iyemarathichiyenagari.com/2021/01/19/chemicals-used-to-kill-virus-on-mask-new-research/


ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/






नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत…

 


नव्या कृषी कायद्यावरून सध्या बरेच वांदग उठले आहे. नेमके हा कायदा शेतकऱ्यांना फायद्याचा आहे की तोट्याचा हे जाणून घेणे गरजेचे आहे. आंदोलने करून सरकारवर दबाब आणता येऊ शकतो. सरकारला वेठीस धरता येते पण यापेक्षा यावर सविस्तर चर्चा करून यातील फायदे तोटे विचारात घेतले तर सर्वांचेच हीत आहे. यासाठी कृषी तज्ज्ञ या नव्या कायद्याबद्दल सांगतात. या संदर्भातील लेख…

नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत… - वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून

http://iyemarathichiyenagari.com/2021/01/21/opinion-of-agriculture-scientists-on-new-agriculture-law/

ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/





मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।



मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे


मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

घेणे देणें सुखचिवरी । हो देई या जगी ।। 16 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणे देणे होऊ दे. 

वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून .....

http://iyemarathichiyenagari.com/2021/01/20/marathi-language-immortal-due-to-spiritual-concept-of-dnyneshwari-article-by-rajendra-ghorpade/


ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/


Sunday, January 24, 2021

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

 


ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

http://iyemarathichiyenagari.com/

 -   सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

http://iyemarathichiyenagari.com/2021/01/22/brazil-president-says-thanks-to-india-in-this-way/


 ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/





समाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ? -

 


समाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ? - 

http://iyemarathichiyenagari.com/

वाचा सविस्तर प्रा अ रा यार्दी यांचे विचार..

http://iyemarathichiyenagari.com/2021/01/24/samadhipad-article-by-a-r-yadri-on-how-to-stable-mind

 ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद असे विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...

http://iyemarathichiyenagari.com/

 



Sunday, December 13, 2020

२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती



२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती   

४ मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती  आकाशा मध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री ९ वाजून १५ मिनिटापर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली.

श्री. कारंजकर म्हणाले, या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो .उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबर ला सूर्याचे उत्तरायण चालू होते.अशा दोनी गोष्टींचा समस्त खगोल प्रेमीसह नागरिकांना आनंद घेता येणार आहे.

श्री. कारंजकर म्हणाले, आपल्या सूर्य मालेतील पाचवा व सगळ्यत मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आप्पापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. गुरु ग्रहाला सूर्यभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी ९ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो.शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यसाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास १० तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो .हे दोनी ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात कि पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांच्या ऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. इंग्रजी मध्ये याला कॉन जंकशन असे म्हणतात.असे जरी असले तरी ते ग्रह एकमेकांपासून फार लांब अंतरावरती असतात.गुरुचे पृथ्वी पासूनचे अंतर यावेळेस ५ पूर्णांक ९२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे तर शनीचे अंतर १० पूर्णांक ८२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे.म्हणजेच ते एकमेकांपासून ४ पूर्णांक ९० अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे अंतर लांब आहेत. एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८७१ किलोमीटर. १५ डिसेंबर पासून संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर हे दोन्ही ग्रह  पश्चिमे कडे रात्री ९वाजून १५ मिनिटापर्यंत आपण पाहू शकता. वरच्या बाजूला असणारा ग्रह शनी तर त्याच्या खालच्या  बाजूला असणारा ग्रह गुरु आहे .२१डिसेंबर ला ते एकमेकांच्या जवळ म्हणजेच ते एकमेकां पासून 0.1 डीग्री म्हणजेच आपल्या चन्द्राच्या व्यासाच्या १ पंचमांश पट अंतर एवढे शेजारी असल्यासारखे दिसणार आहेत.या तारखे नंतर मात्र ते पश्चिम दिशेला  एक्मेखापासुन लांब जाताना दिसणार आहेत यावेळी मात्र त्यांचं क्रम बदलनार  आहे.यानंतर असाच सोहळा बगण्यासाठी आपणाला १५ मार्च २०८० सालापर्यंत वाट बगावी लागणार आहे.या तारखेला याच्यापेक्षा जास्त चांगली स्थीती पूर्वे दिशेला पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी पाहावयास मिळणार आहे.

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची संधी...

 इंटरनॅशनल स्पेस स्टेशन  पाहण्याची संधी...

आयएसएस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन डोळ्यांनी काही मिनिटांकरिता पाहावयास मिळणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातील खगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली. 

श्री. कारंजकर म्हणाले, हे स्पेस सेन्टर पृथ्वी भोवती ९० मिनिटामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते .त्याचा वेग एका तासाला १७ हजार ५०० मैल म्हणजे २८ हजार किलोमीटर एवढा असतो. स्पेससेंटर वरती पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने हे स्पेस सेंटर पाहावयास मिळणार आहे. हे बघत असताना विमान अथवा मोठा तारा आकाशामधून जात आहे, असे दिसते. याची क्षितिजावरून असणारी उंची डिग्री अथवा इलेव्हशनमध्ये मोजली जाते, असे श्री. कारंजकर यांनी सांगितले.

या दिवशी यावेळी दिसणार स्पेस स्टेशन...

१४ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजून २२ मिनीटांपासून  ५ मिनिटाकरिता पश्चिम वायव्य दिशेकडून ११ डिग्री उंचीवरून दक्षिणदिशे कडे १० डिग्री उंचीकडे जाणार आहे.

१७ डिसेंबरला सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून सहा मिनिटाकरता दक्षिण नैऋत्य दिशेकडून १० डिग्री उंचीवरून  पूर्व ईशान्य दिशेकडे १० डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१८ डिसेंबरला पहाटे ५ वाजून २० मिनटापासून एक मिनिट करिता  १० डिग्री उंचीवरून दक्षिण आग्नेय दिशेकडून १० डिग्री उंची वरून आग्नेय दिशेकडे १४ डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१९ डिसेंबर ला पहाटे ६ वाजून ८ मिनटापासून सहा मिनिटांकरिता १० डिग्री उंचीवरून पश्चिम नैऋत्य दिशेकडून उत्तर ईशान्य दिशेकडे ११ डिग्री उंचीवरून जाणार आहे .

२० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपासून ३ मिनिटांकरिता पूर्व आग्नेय दिशेकडून हे स्पेस सेंटर ११ डिग्री उंचीवरून ईशान्य दिशेकडे जाणार आहे,

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


Saturday, December 12, 2020

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूरः  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय 20 जानेवारी 2021 पर्यंत पोचतील, अशा रितीने पाठवावीत. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन आणि बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही ) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जातील. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे असेल.  पहिल्या अक्षरसागर साहित्य संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

संपर्क - राजन कोनवडेकर (अध्यक्ष)  9822226458,  प्रा. डाॅ. अर्जुन कुंभार (उपाध्यक्ष) 9890156911, डाॅ. मा. ग. गुरव (सदस्य)  9421114262   

पुस्तके पाठवणेचा पत्ता -  बा. स. जठार, सचिव,  अक्षरसागर साहित्य मंच, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - 416209. मो. 9850393996,    9403466256   

डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड


 डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड केली आहे. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही राज्यातील नामांकित संस्था असून फेलोच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील शास्त्रज्ञांचा त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाते. या यादीमध्ये सन २०२० यावर्षासाठी शिवाजी विद्यापीठातून प्रा. गरडकर यांची एकमेव निवड झाली आहे.

प्रा. गरडकर हे नॅनोमटेरिअल्स या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी पाण्यातील रंगद्रव्यांचे विघटन सूर्यप्रकाशाच्या मदतीने करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही रंगद्रव्य फक्त अर्ध्यातासामध्ये जवळपास ९५ टक्के नष्ट केली आहेत. तसेच त्यांची राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर एकूण १५० शोधपत्रिका प्रकशित झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी मिळाली असून सध्या ८ विद्यार्थी नॅनोमटेरिअल्स या विषयावर कार्य करीत आहेत. सध्या ते डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

प्रा. गरडकर यांना संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची २०१८ सालीची शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. तसेच ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळात संपादक व परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामातील तत्परता पाहून अमेरिकन केमिकल सोसायटी सारख्या अनेक नामवंत प्रकाशकांनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. संशोधनातील उत्तम गुणवत्ता मूल्यांकन हे एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स, व सायटेशन यांच्या आधारे केले जाते. त्यानुसार प्रा. गरडकर यांच्या संशोधनाचा एच इंडेक्स ३५ , आय-१० इंडेक्स ८५, व सायटेशन्स ३७०० इतकी आहेत.

Friday, December 11, 2020

स्त्रीचे प्रेम



स्त्रीचे प्रेम 

स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्सें घरीं । 

तैसें प्रेम एथिचें करी । स्थानपती ।। 635।। अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ ः अथवां गाय डोंगरात चरत असते परंतु तिचें सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहीलेले असते त्याप्रमाणे या विश्वरुप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. 

स्त्री लग्नानंतर सासरी जाते, पण तेथे माहेरच्याच गोष्टींचे गोडवे गात राहाते. माझ्या माहेरात हे आहे. माझ्या माहेरात ते चांगले आहे. जरी अठराविश्व दारिद्य माहेरात असले तरी तिच्या मनात माहेर विषयी आपुलकी असते. तिच्या मनात माहेर कायमचे घर करून राहीलेले असते. हे मातृप्रेम आहे. ही मायेची ओढ आहे. हा जिव्हाळा आहे. माहेरची माया ती कधीही विसरू शकत नाही. सासरी ऐश्वर्य जरी असले तरी माहेरच्या प्रेमातच त्या स्त्रीचे मन गुंतलेले असते. हे प्रेम का असते ? ही ओढ का असते ? प्रेमाच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी आपले मन ओढले जात असते. ते आपण कधीही विसरू शकत नाही. पैसा, संपत्ती अमाप मिळाली, ऐश्वर्य ओसंडून जरी वाहत असले तरी प्रेमाने मिळालेली चादर, आधार  केव्हाही आपल्या मनातून दूर जात नाही. ती आठवण कायमची स्मरणात असते. म्हणूनच स्त्री कधीही माहेर विसरू शकत नाही. कारण त्या प्रेमात ती गुंफलेली असते. आजकाल स्त्रिया सुद्धा पुरूष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कामानिमित्त त्या कोठेही असल्यातरी त्यांचे लक्ष घरातील तान्हुल्याकडे कायम असते. पाळणाघरात तिचे संगोपन योग्यप्रकारे होत असले तरीही त्या मायेच्या मनात मात्र त्या तान्हुल्याची ओढ असते. इतकेच काय बाहेर बाजारात खरेदीसाठी गेल्या तरी त्यांच्या मनात घरास कुलुप निट लावले आहे का? घरातील गॅस बंद केला आहे का ? असे विविध प्रश्न सुरु असतात. इतक्‍या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनात घर करून राहीलेल्या असतात. त्यांची घराची ओढ ही कायम असते. गाय चरायला डोंगरावर गेली तरी तिचे लक्ष चरतानाही गोठ्यातील वासराकडे असते. हे मातृप्रेम आहे. पक्षी सुद्धा तिच्या पिलाला खाद्य आणण्यासाठी बाहेर गेला तरी पंख न फुटलेल्या घरट्यातील पिलाकडेच मन असते. ही ओढ कायम असते. हे प्रेम कायम असते. अध्यात्मात सद्‌गुरुंना अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. कुठेही बाहेर गेलात तरी भगवंताचे स्मरण नित्य असायला हवे. त्याच्याकडे अशी ओढ असायला हवी. येणाऱ्या अनुभुतीकडे अवधान असायला हवे. मन सतत भगवंताकडे ओढलेले असावे. मनात साधनेचा विचार असायला हवा. कारण साधना ही नित्य सुरु असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. मन सदैव त्यामध्ये गुतलेले असावे. सो ऽ हमचा स्वर नित्य सुरु असतो. पण आपले लक्ष त्याकडे नसते. त्यामध्ये मन गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर सतत स्मरणात असायला हवा. त्याचे ध्यान सतत सुरू असायला हवे. तो ऐकायला हवा. तरच आपण आत्मज्ञानाकडे ओढले जाऊ. सद्‌गुरुंच्या कृपेने आपणास आत्मज्ञानी होता येते. यासाठी तशी ओढ साधनेत कायम असायला हवी. स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. स्त्रीची ओढ माहेरी जशी असते तशी अध्यात्माकडे आपली ओढ असायला हवी. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा.  

Wednesday, December 9, 2020

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

 


सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी) 

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरू ।

ऐसे म्हणो नि अव्हेरू । करणें घडे ।। 625 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ ः एखाद्या मनुष्यास सोन्याचा डोंगर प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला घेता येत नाही असे म्हणून सोन्याच्या डोंगराचा त्याग करणे घडेल काय ?

आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होत असते.  कधी ती धनाच्या स्वरुपात असते तर कधी स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात असते. फुकट मिळालेल्या गोष्टीचे मोल आपणाला फारसे नसते. पण योग्यवेळी एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ती गोष्ट आपणासाठी अनमोल ठरते. या वस्तू आपणास भेट स्वरुपात मिळतात. कोणी प्रेमाने देतात. तर कोणी मदत म्हणून देत असतात. त्यातही त्याची आपल्याबद्दल आपुलकी असते. आई वडील मुलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटवस्तू देतात. सद्गुरु सुद्धा प्रेमाने शिष्याला अशा भेट वस्तू देत असतात. मित्र मैत्रिणीसुद्धा आपणास प्रेमाने भेट वस्तू देत असतात. आपण या भेट वस्तू स्वीकारतो. कारण आपले प्रेम असते. एक मैत्रीचे, जिव्हाळ्याचे भावनिक नाते असते. प्रेमापोटी आपण या वस्तू स्वीकारतो. याचा त्याग केला तर देणाऱ्याला याचे निश्चितच दुःख होईल. विश्वरुप दर्शनात तर भगवंत अर्जुनाला संपूर्ण राज्य तुझ्याकडे चालुन आले आहे. असे सांगत आहेत. याचा त्याग करून चालणार नाही ते शोभणारही नाही. याचा त्याग करून युद्धभुमी सोडून गेलास तर अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला असे शत्रू म्हणतील. यासाठी याचा त्याग करणे अयोग्य आहे. असे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. कारण मिळाले आहे त्याचा स्वीकार करणे हाच धर्म आहे.  

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.  प्रेमाचा अनादर करणे हे धर्माला शोभणारे नाही. सद्गुरु सुद्धा इच्छा नसतानाही भक्तांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करत असतात. उपयोग नाही म्हणून त्याचा त्याग करत नाहीत. प्रेमाने अनेक गोष्टी साध्य होतात. चार प्रेमाचे शब्दही जीवनात मोठा बदल घडवू शकतात. मग प्रेमाने दिलेली भेट वस्तू तुमचे जीवन का बदलवू शकणार नाही ? दुष्टाच्या मनातील दुष्टपणाही प्रेमाने नष्ट करता येतो. दुरावलेल्यांना प्रेमाने जवळ करता येते. यासाठी बोलण्यात, वागण्यात प्रेमाचे चार शब्द असावेत. 

प्रेम ही भक्तीची महत्त्वाची पायरी आहे. अध्यात्मिक विकासातही त्याला महत्त्व आहे. साधनेमध्ये मन स्थिर ठेवण्यास प्रेमाची मोठी मदत होते. प्रेमामुळे मनाचा उत्साह कायम राहातो. सद्गुरुंच्याजवळ तर प्रेमाचा सागरच असतो. या सागरात आपण डुंबायला शिकले पाहीजे. प्रेमाने आंघोळ करून मन स्वच्छ करायला हवे. मनाची स्वच्छता ही अध्यात्मिक विकासासाठी गरजेची आहे. साधना करताना भक्ताला अनेक अनुभव येतात. प्रेमाने सद्गुरु हे शिष्याला शिकवत असतात. साधनेतून आत्मज्ञानाचा लाभ झाला तर त्याचा त्याग करून कसे जालेल. 

एखादी गोष्ट आपणास त्रास देत असेल. कटकटीची असेल तर ती आपण सोडून दिली पाहीजे असे वाटते. पण त्याचा त्याग केला तर ती कटकट कायमची मिटते असे होत नाही. ती कटकट कधी ना कधी त्रासदायक ठरते. यासाठी त्याग न करता आहे त्याचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. यासाठी त्याग कशाचा करायचा या अभ्यास करायला हवा. त्याग केल्याने समस्या सुटतात असे होत नाही. त्या बळावतात. यासाठी ती समस्या सोडवण्याकडे आपला कल असायला हवा. सोन्याचा डोंगर मिळाला. कदाचित हा त्रासदायकही ठरू शकतो. यातून सोने काढता येणे शक्यही नाही. मग हा घेऊन आपण काय करायचे असे म्हणून आपण त्याचा त्याग केला तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून त्यातून विकास करायला शिकले पाहीजे. अध्यात्मिक प्रगती ही टप्प्याने होत असते. सोन्याचा डोंगर मिळाला म्हणजे सर्व काही मिळाले असे होत नाही. आत्मज्ञान झाले तरी त्याचा वापर कसा करायचा याचे ज्ञान असायला हवे. यासाठी मिळाले आहे त्याचा स्वीकार करून वाटचाल करायला हवी. 

   ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा.